धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत शिव्या देतात – मुंडेंनी दिलेल्या शिव्यांचे माझ्याकडे चार कॅसेट असल्याचा सोनवनेचा इशारा

0 223

धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत शिव्या देतात
– मुंडेंनी दिलेल्या शिव्यांचे माझ्याकडे चार कॅसेट असल्याचा सोनवनेचा इशारा

बीड : धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत कशा शिव्या देतात याच्या माझ्याकडे चार कॅसेट आहेत. त्यामुळे त्यांनी माज्यावर टीका करू नये अन्यथा मी निवडणूक आयोगाकडे या कॅसेट सादर करील, असा थेट इशारा महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे प्रचार सभेतून धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

शहीद नागेश राक्षे यांच्यावर अंत्यसंस्कार – नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, उपस्थितांकडून हळहळ व्यक्त

आपले आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल बाहेर आणतील – मराठा आरक्षणाला विरोध करणारांना पाडा, मनोज जरांगे यांचे आवाहन
यावेळी ते म्हणाले की, धनंजय मुंडे मला बहुरंगी म्हणतात मात्र त्यांचाच बहुरंगीपणा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. मी रंगात रंग मिसळणारा बजरंग असून दोन्ही बहीण भावाने माझ्यावर टीका करण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं, असा सल्लाही सोनवणे यांनी मुंडे कुटुंबियांना दिला. प्रीतम मुंडे यांनी संसदेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून संसदेत त्या कधीच बोलल्या नाहीत. दहा वर्ष खासदार असताना बीड जिल्ह्यात कोणता मोठा प्रकल्प आणला हे त्यांनी सांगावं, अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी मुंडे यांच्यावर टीका केली.
दिल्ली ते गल्लीपर्यंत दहा वषार्पासून तुमची सत्ता होती. तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काय केलं. बीड जिल्ह्यात पाणी आणणार असं तुम्ही म्हणता मात्र ते पाणी अद्यापही आलेलं नाही. शेतकºयांच्या शेतमालाला अद्यापही पुरेसा भाव मिळत नाही आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच मला संसदेत निवडून जायचं आहे त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा विकासाचं राजकारण जिल्ह्यात झालं पाहिजे, असं बजरंग सोनवणे म्हणाले.
तिकीट देण्याचा अधिकार पंकजा मुंडेंना आहे?
बीडमधील भाजपच्या प्रचार सभेतून पंकजा मुंडे यांनी मी प्रीतम मुंडेंना नाशिक मधून निवडणुकीत उभं करेल म्हटले होते. मात्र प्रीतम मुंडे यांना तिकीट देण्याचा अधिकार पंकजा मुंडे यांना आहे का असा देखील प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडे यांची उंची अनैतिक
मी तीस वर्षांपासून राजकारणात आहे तर तुम्ही फक्त पंधरा वषार्पासून राजकारणात आलात असे म्हणत सोनवणे यांनी राजकारणामध्ये माझी उंची आणि लायकी काढली जाते. मात्र, माझी उंची नैतिक आहे तर धनंजय मुंडे यांची उंची अनैतिक आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.

माझे नाव वापरून मत मागणारांनाही पराभूत करा – मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन

मनोज जरांगे यांच्यावरील संघर्षयोध्दा सेन्सॉरच्या कात्रीत ‑ संघर्षयोध्दा चित्रपट आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे मनोज जरांगे यांचा इशारा

मनसेच्या पाठिंब्यानंतर ओटो की बात नोटो तक – रसद पुरवा; बाळा नांदगावकरांची महायुतीकडे साद

Leave A Reply

Your email address will not be published.