माझे नाव वापरून मत मागणारांनाही पराभूत करा – मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन

0 42

माझे नाव वापरून मत मागणारांनाही पराभूत करा
– मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन

मानवत : मराठा आरक्षणास विरोध करणाºया लोकसभेच्या उमेदवारांना या निवडणुकीत ताकदीने पराभूत करा. माझे नाव वापरून मत मागणारांनाही तेवढ्याच ताकतीने पराभूत करा, असे आवाहन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजास केले. तालुक्यातील यशवाडी येथील संवाद सभेत २० एप्रिल रोजी ते बोलत होते.
या संवाद सभेसाठी तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी लोकसभेसाठी कोणताही उमेदवार उभा केलेला नाही किंवा कोणासही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे माझे नाव वापरून मत मागणारांनाही तेवढ्याच ताकतीने पराभूत करा. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मदत करणाºयांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

मनोज जरांगे यांच्यावरील संघर्षयोध्दा सेन्सॉरच्या कात्रीत ‑ संघर्षयोध्दा चित्रपट आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे मनोज जरांगे यांचा इशारा

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात
८ जून रोजी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर विशाल महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ९०० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळावर होणार आहे. या सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विशाल महासभेस उपस्थित राहण्याचे मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. या सभेसाठी येताना प्रत्येकाने आपल्या गाडीवर स्टिकर लावून शांत, संयम आणि शिस्तीत यावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेच्या पाठिंब्यानंतर ओटो की बात नोटो तक – रसद पुरवा; बाळा नांदगावकरांची महायुतीकडे साद

अंजनडोह येथील अखंड हरिनाम सप्ताहास मनोज जरांगे पाटील देणार भेट – सप्ताहास भेट देऊन गावक-यांशी संवाद साधणार

 

Leave A Reply

Your email address will not be published.