अंजनडोह येथील अखंड हरिनाम सप्ताहास मनोज जरांगे पाटील देणार भेट – सप्ताहास भेट देऊन गावक-यांशी संवाद साधणार

0 116
अंजनडोह येथील अखंड हरिनाम सप्ताहास मनोज जरांगे पाटील देणार भेट
– सप्ताहाला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधणार
किल्ले धारूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने न्या. शिंदे समितीच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधण्याचे काम केले. मात्र सगेसोयरे या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष केले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी द्वेष भावनेतून मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी गावभेटी देण्याच्या निमित्ताने बुधवार दि. २३ रोजी रात्री ७:३० वाजता अंजनडोह येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट देऊन मराठा बांधवांसी संवाद साधणार आहेत.
८ जून रोजी नारायणगड येथे होणा-या मराठा समाजाच्या विश्वविक्रमी सभेची जोरदार तयारी सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील किल्ले धारूर तालुक्याच्या दौ-यावर येत  आहेत. जरांगे पाटील हे या गावभेट दौ-यात अनेक गावांना भेट देऊन मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. मराठा समाजाला आरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी ते दिवसरात्र संवाद साधत आहेत. या दौ-यात त्यांच्या बैठकांना मराठा समाजाकडून उत्पुर्त प्रतिसाद मिळत आहे.
मराठा समाजाने मतदान करण्यापुर्वी आंतरवाली सराटी येथील माता माऊलींच्या अंगावरील वळ आठवून मतदान करा. मराठा आरक्षणाला विरोध करणा-यांना मराठा समाजाने या निवडणुकीत पाडावे, पाडण्यात सुध्दा मोठी ताकद आहे, असे मनोज जरांगे आपल्या भाषणातून सांगतात त्यामुळे अनेकांचे छाबे दणाणले असल्याचे दिसत आहे. त्यात बीड लोकसभेची निवडणूक सुरू असून पंकजा मुंडे यांनी आंदोलन करून आरक्षण मिळत नसते अशी टीका मनोज जरांगे पाटील यांचेवर केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर पंकजा मुंडे याचा सुर नरमला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या  गावभेट दौ-याचा परिणाम लोकसभा निवडणूकीत होणा-या मतदानावर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे पाटील धारूर तालुक्यातील गावांना भेटी देणार त्यांची जोरदार तयारी सुरू असून या संवाद दौ-यात ते मराठा बांधवांना कोणता संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सभा किल्ले धारूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सभा झाली होती त्यावेळी या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
मनोज जरांगे पाटील यांच्या दौ-याची रूपरेषा
ठिकाण                   वेळ
किल्ले धारूर         सांय. ०५:०० वा.
आवरगाव              सांय. ०५:३० वा.
पांगरी                    सांय. ०५:४५ वा.
कोळपिंपरी            सांय. ०६:०० वा.
वाघोली                  सांय. ०६:०० वा.
खोडस                   सांय. ०६:१५ वा.
आडस                   सांय. ०६:४५ वा.
आसरडोह             सांय. ०७:१५ वा.
रूई धारूर            सांय. ०७:३० वा.
अंजनडोह              सांय ०७:४५ वा.
असोला                  सांय ०८:०० वा.
चोरांबा                   सांय ०८:१५ वा.
चारदरी                  सांय ०८:३० वा.
Leave A Reply

Your email address will not be published.