मनोज जरांगे यांच्यावरील संघर्षयोध्दा सेन्सॉरच्या कात्रीत ‑ संघर्षयोध्दा चित्रपट आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे मनोज जरांगे यांचा इशारा

0 87
मनोज जरांगे यांच्यावरील संघर्षयोध्दा  सेन्सॉरच्या कात्रीत
‑ संघर्षयोध्दा चित्रपट आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे मनोज जरांगे यांचा इशारा

 

बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपली जामीन विकून हा लढा तेवत ठेवण्यााचे काम केले. त्या मनोज जरांगे पाटीलांच्या आयुष्यावर संघर्षयोध्दा येणार आहे. मागील चार पाच महिन्यांपासून या चित्रटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी राज्यातील सर्व चित्रपट गृहात एकाच वेळी प्रदर्शित होणार  होता. पण निवडणूक आणि आचारसंहितेचे कारण दाखवत हा चित्रपट सेन्सॉरने आपल्या कात्रीत आडकला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संघर्षयोध्दा चित्रपट जाणिवपुर्वक आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावरील संघर्षयोध्दा या चित्रपटाचे लेखन, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी केले आहे. हा चित्रपट ऐन रिलीज होण्यापुर्वी  सेन्सॉर बोर्डाने थांबविल्याची माहिती निर्माते दोलताडे यांनी दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, संघर्षयोध्दा चित्रपट सेन्सॉरने थांबविला असला तरी, चॅलेज देऊन सांगतो की, २१ जून २०२४ या नव्या तारखेल सगळ्या समाजासह संपूर्ण महाराष्ट्र हा चित्रपट बघेल. संघर्षयोध्दा हा चित्रपट जाणून बुजून अडविण्याचा प्रयत्न करणार असेल तर गाठ माझ्याशी आहे. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाविषयी बोलेल. ८ जून रोजी नारायणगड येथे ९०० एक्कर वरील सभेत २१ जून २०२४ रोजी होणाºया संघर्षयोध्दा या चित्रपटाविषयी प्रमोशन करा, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही :  सेन्सॉर बोर्ड
संघर्षयोध्दा चित्रपटावर सांगितले की, सध्या देशात आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही, असे कारण देत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे प्रदर्शन काही दिवसांसाठी थांबविले आहे.
चित्रपटाचे प्रदर्शन थांबल्याचे दु:ख
चित्रपटाच्या टीमने कमी दिवसांमध्ये जास्त वेळ देऊन कष्टाने हा चित्रपट बनविला. मात्र ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबविल्याचे दु:ख होत आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट होणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील यांनी व्यक्त केला.
सेन्सार बोर्डाच्या भुमिकेचा निषेध
ऐन प्रदर्शित होणाच्या तोंडावर सेन्सॉर बॉर्डाने मनोज जरांगे यांच्यावरील संषर्घयोध्दा हा चित्रपटाचे प्रदर्शन थांबविल्यामुळे समाजातून तिव्र प्रतिक्रीयेसह सेन्सार बोर्डाच्या भुमिकेचा निषेध व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट आता २१ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.