मनसेच्या पाठिंब्यानंतर ओटो की बात नोटो तक – रसद पुरवा; बाळा नांदगावकरांची महायुतीकडे साद

0 83

मनसेच्या पाठिंब्यानंतर ओटो की बात नोटो तक
– रसद पुरवा; बाळा नांदगावकरांची महायुतीकडे साद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मनसे बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. मात्र मनसेने दिलेला हा पाठिंबा धन से ओटो की बात नोटो तक असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचे असे की, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्ते तन आणि मनानं तुमचे काम करतील. तुम्ही केवळ रसद पुरवा, अशी साद महायुतीला घातली आहे.

मनोज जरांगे यांच्यावरील संघर्षयोध्दा सेन्सॉरच्या कात्रीत ‑ संघर्षयोध्दा चित्रपट आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे मनोज जरांगे यांचा इशारा

शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले – भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा
संभाजीनगर येथील आयएमए हॉलमध्ये मनसे पदाधिकाºयांचा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, मनसेचे संपर्क नेते दिलीप धोत्रे, जिल्ह्याध्यक्ष सुमीत खांबेकर उपस्थित होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी या निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाºयांना मानसन्मान मिळावा. पक्षप्रमुखांचे छायाचित्र प्रचार रॅलीत असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. नांदगांवकरांनी रसद पुरवा म्हटल्याने मनसे कार्यकर्त्यांना नोटांचा मानसन्मान मिळणार मिळणार की काय अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्याचे समोर येत आहे.
मनसे हा पक्ष मागणी १८ वर्षांपासून इंजिनाच दिशा बदलत असल्याने सत्तेत टीकाव धरत नसावा असेही बोलले जात आहे. त्यामुळे तर मनसे नेत्यांकडून पक्षाचे कार्यकर्ते तन आणि मनानं तुमचं काम करतील. तुम्ही त्यांना धन द्या. रसद पुरवा, अशी मागणी होताना दिसत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात मनसे पदाधिकाºयांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री संदिपान भुमरेंनी दिल्याने मनसे कार्यकर्त्यांना कोणता मानसन्मान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात

राज्यात मराठ्यांच्या भीतीने लोकसभेचं पाच टप्यात मतदान – मनोज जरांगे पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

 

Leave A Reply

Your email address will not be published.