आपले आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल बाहेर आणतील – मराठा आरक्षणाला विरोध करणारांना पाडा, मनोज जरांगे यांचे आवाहन

0 166

आपले आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल बाहेर आणतील

– मराठा आरक्षणाला विरोध करणारांना पाडा, मनोज जरांगे यांचे आवाहन

किल्ले धारूर : मराठा समाज स्वातंत्र्यपुर्व काळापासून आरक्षणात आहे, हे सत्य स्विकारलेच पाहिजे. मराठा कुणबी एकच असून मराठ्यांच्या ओबीसीकरणाराला आडवा केल्याशिवाय मी राहणार नाही. आरक्षणाला विरोध करणारांना असे पाडा की त्यांच्या पाच पिढ्यांनी हा पराभव लक्षात ठेवला पाहिजे असे आवाहन करीत त्यांनी आपले दहा आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल आणतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तालुक्यातील अंजनडोह येथे अखंड हरिनाम सप्ताहला भेट देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आले असता त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर मराठा समाजाच्या लेकरांची जबाबदारी आहे.  मी कधीही इतर जाती धर्माचा विरोध करीत नाही, मात्र त्यांच्या नेत्यांना सोडत नाही. त्यांनी सर्वांचा उपयोग करून घेतला आहे,असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारने ५० टाक्यांच्या वर दिलेले आरक्षण टिकणार नाही. राज्य सरकारने आता दिलेले १० टक्के आरक्षण फसवे असून त्याचा कोणालाही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. मराठा कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

माझ्या जवळचे अनेक जण सरकारने पैश्याच्या जोरावर फोडले. मला फोडण्याचा प्रयत्न केला पण ही खानदानी असल्याने मी फुटू शकते नाही. माझ्या इमानदारीच्या जोरावर मी सरकारमधील अनेक नेते फोडले. इमानदारी विकत घेण सोपं नसतं. आपल्याला भेटायला आलेला मंत्री परत कधीच आंतरवाली सराटीत आला नाही, असा टोला लगावत त्यांनी देव जरी आडवा आला तरी  मराठ्यांना ओबीसीत जाण्यापासून कोणीही आडवू शकत नाही‌, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारने उधळला बैलांचा गुलाल
राज्य सरकारने यापुर्वी दोन वेळा आरक्षण दिले पण ते न्यायालयात टिकत नाही. आता सरकरने १० टक्के आरक्षण दिले असून त्याचा कोणीही गुलाल उधळला नाही म्हणून राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या अंगावर बैलांचा गुलाल उधळून आनंद साजरा केला. ही मराठा समाजाची फसवणूक आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

नेत्याला आणि पक्षाला बाप समजू नका
मराठ्यांची कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभेला जायचे नाही. नेत्याला आणि पक्षाला बाप समजू नका, राज्याच्या राजकारणात भैय्यांचा उताडा आला आहे. राजकारणासाठी मराठ्यांनी एकजुट फुटू देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

ओबीसी बांधवांकडून जरांगे पाटील यांचा सत्कार
मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी गावातील सर्व समाजातील समाजबांधव एकवटले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत ओबीसी बांधव युवराज कांबळे व संपत्ती शिंपले यांनी केले. यावेळी गावातील तेली, नाव्ही व धनगर  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सगळा सडलेला माल भाजपमध्ये गेला’

मी मराठा आरक्षणाची मागणी करीत असल्याने सरकारकडून माझी एसआयटी चौकशी केली जाणार आहे. मी जेलमध्ये गेल्यास तिथल्या कैद्यांना आरक्षण शिकवून तिथेच आरक्षणाचा मोर्चा काढीन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ज्यांनी घोटाळे केले तो सडलेला सगळा माल भाजपात गेला असे सांगून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.