शहीद नागेश राक्षे यांच्यावर अंत्यसंस्कार – नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, उपस्थितांकडून हळहळ व्यक्त

0 61

शहीद नागेश राक्षे यांच्यावर अंत्यसंस्कार
– नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, उपस्थितांकडून हळहळ व्यक्त

मेहकर (विनोद सदावर्ते) : तालुक्यातील आरेगांव येथील बीएसएफ जवान नागेश राक्षे हे आसाम मधील त्रिपुरा येथे आपले कर्तव्य बजावत असताना बुधवार दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहीद झाले. शहिद नागेश राक्षे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून, मेहनत व जिद्दीच्या जोरावर देशाची सेवा करण्याचे स्वप्न साकार करून आपले जिवन देशसेवेसाठी झोकुन दिले. आपल्या सेवेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये कर्तव्य बजावून देशाची सेवा केली. शहीद जवान नागेश राक्षे हे त्रिपुरा येथील तुकडीमध्ये कार्यरत होते. २४ एप्रिलच्या रात्री सिमा पाहणी करताना त्यांना विर मरण आले. गरिब घरातील मुलांने देशसेवेची जिद्द करावी आणि हसत हसत देशसेवा करताना विरमरण यावे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातील लोकांचे मन भरून आले. शहिद राक्षे यांच्यावर दिनांक २६ एप्रिल २०२० रोजी सांयकाळी चार वाजता त्यांच्या आरेगांव या गावी अत्यंत भावून वातावरणात शासकीय नियमानुसार अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या उपस्थितांकडून हळहळ व्यक्त केली गेली.

शहीद जवान नागेश राक्षे यांनी आपले जिवन देशासाठी दान देऊन खरी देशसेवा करून आरेगांवचे नाव देशपातळीवर लौकिक केले. नागेश राक्षे यांना बीएसएफ, बुलढाणा पोलीस यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शहीद नागेश यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार म्हणून समस्त गावकरी यांनी आर्थिक सहकार्य केले. समस्त गावकरी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, छत्रपती सेना, समाज एकता अभियान यांनी एकत्रित पणे आर्थिक मदत करून शहिद नागेश राक्षे यांना सलामी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.