नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

1 3,820

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव
– इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

नांदेड : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून यातील दुस-या टप्यात राज्यातील काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली मात्र नांदेड लोकसभा मतदार संघात बिलोली तालुक्यातील एका मतदार संघात भाऊसाहेब एडके या तरूणाने कु-हाडीच्या साहाय्याने इव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट मशिनची तोडफोड केल्याने त्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला सर्वोच्च क्लीन चिट – व्हीव्हीपीएटी स्लिप्सची १०० टक्के जुळणी होणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

‘नको आम्हाला कलम ३७०, रिंगणात पाहिजेत उमेदवार १०७०’

नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का?

मनोज जरांगे यांच्या भाषेने कंबरेखाली दुखापत का व्हावी?
लोकसभेच्या दुस-या टप्प्यात आज नांदेड लोकसभा मतदार संघात मतदान सुरू असतानाच जिल्ह्यातील बिबोली तालुक्यातील रामतीर्थ या गावातील एका मतदान केंद्रावर गावातील भाऊसाहेब एडके या ३५ वर्षीय तरूणाने मतदान केंद्रावर मतदान जाण्यापूर्वी आपल्या शर्टच्या आत छोटी कु-हाडी लपवून त्याने मतदान केंद्रात प्रवेश केला. यावेळी त्याने मतदान करताना लपवून आणलेल्या छोट्या कुºहाडीने इव्हीएम व व्हीव्हीपॅट यांच्या जोडणारे केबल तोडून इव्हीएमची तोडफोड करून आपला निषेध व्यक्त केला.
भाऊसाहेब एडके या तरूणाने व्हीव्हीपॅट व इव्हीएम फोडल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने ही इव्हीएम मशिन का फोडली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत शिव्या देतात – मुंडेंनी दिलेल्या शिव्यांचे माझ्याकडे चार कॅसेट असल्याचा सोनवनेचा इशारा

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा
इव्हीएम संदर्भात मतदारांच्या मनात अनेक संशय आहेत. यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये इव्हीएममशिनमध्ये बिघाड झाल्याच्या घटनांमुळे मतदारांचा यावर विश्वास राहिलेला दिसत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून वामन मेश्राम यांनी इव्हीएम फोडणार असल्याचे खुले आव्हाण निवडणूक आयोगाला दिले होते. यासाठी त्यांनी गावपातळीवर कमिट्या स्थापन करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.
रामतीर्थ गावातील मतदान केंद्रावर जो प्रकार घडला त्याबद्दल राज्यातील जनता एकांतामध्ये बरे झाल्याची भावना व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या तिसºया टप्प्यात निवडणूकांसाठी इव्हीएमचा वापर होणार का याकडे सार्वंचे लक्ष लागले असून रामतीर्थ मधील या प्रकाराची पुनरावृत्ती किती गावात होणार याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

टाकळी येथील बुथवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड – १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलल्यानंतर मतदान सुरूळीत

आपले आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल बाहेर आणतील – मराठा आरक्षणाला विरोध करणारांना पाडा, मनोज जरांगे यांचे आवाहन

1 Comment
  1. Sanchi Punekar says

    EVM machine cha nishedh!

Leave A Reply

Your email address will not be published.