नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही – हा त्यांचा बालिशपणा म्हणत छगन भुजबळांचे नाव ने घेता पंकजा मुंडेचा टोला

0 131

नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही
– हा त्यांचा बालिशपणा म्हणत छगन भुजबळांचे नाव ने घेता पंकजा मुंडेचा टोला

बीड : प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं वक्तव्य गमतीने केलं होतं. नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही, असे म्हणत बीड लोकसभेतून महायुतीच्या उमेदवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी युटर्न मारला. मात्र त्यांच्या या व्यक्तव्यावर व्यक्त होणाºयांना त्या बालिशपणा म्हटल्याने त्यांनी अप्रत्यक्षणे नाव न घेता छगन भुजबळांना टोला लगावाल्याचे बोलले जात आहे. आहे.

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

आपले आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल बाहेर आणतील – मराठा आरक्षणाला विरोध करणारांना पाडा, मनोज जरांगे यांचे आवाहन

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध
प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून लोकसभेला उतरवण्याच्या वक्तव्याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की हाच बालिशपणा आहे. विषय बीडचा. मी गमतीने म्हटलं, कारण प्रीतम मुंडेंचं सासर नाशिकचं आहे. लगेच उद्याची निवडणूक प्रीतम नाशिकातून लढणार असा होत नाही. एवढे मॅच्युअर लोक मीडियात आहेत, राजकारणात आहेत. त्याला मिठाच्या चुटकीप्रमाणे घ्यायला हवं, तर सगळे हात धुवून मागे लागले. एवढी मोठी खासदार आहे ती. दहा वर्ष तिने काम केलं. अचानक मला उमेदवारी मिळाली. तर तिच्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. तिचा संपर्क दांडगा आहे. सगळे म्हणतात प्रीतमताई एका फोनवर अव्हेलेबल असतात. मी गमतीने म्हटलं. लगेच नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही. अस्वस्थ होण्यापेक्षा जास्त लोक आनंदीच झाले आहेत, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजांना बीडकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा म्हणाल्या की या वक्तव्याविषयी मला काही माहिती नाही. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. वडीलधाºयांनी कसं बोलावं, हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती. मी वडिलकीचा सल्ला म्हणून स्वीकारते.

मनसेच्या पाठिंब्यानंतर ओटो की बात नोटो तक – रसद पुरवा; बाळा नांदगावकरांची महायुतीकडे साद

Leave A Reply

Your email address will not be published.