तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे – आत्मा बाहेर काढण्याचा बहाण्याने विवाहितेच्या अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ

0 40

तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे
– आत्मा बाहेर काढण्याचा बहाण्याने विवाहितेच्या अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे तिच्या घरातील मंडळींनी महिलेचा अमानुष छळ करण्यास सुरूवात केली आहे. तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे, त्यामुळे मुलबाळ होत नाही. मूलबाळ होण्यासाठी तो आत्मा बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण करीत अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहित महिला ही गंगापूर शहरातील आहे. महिला ३५ वर्षाची आहे लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर देखील महिलेला मूलबाळ होत नसल्याने घरात तीला सतत अपमानास्पद वागणूक मिळत असे. मूलबाळ होण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात आले. सततच्या होणाºया छळाला सदरील महिला कंटाळली होती. अखेर जवळच्या एका नातेवाईकांनी तुझ्या अंगात तृतीयपंथीयचा आत्मा आहे. तो बाहेर काढण्यासाठी जादूटोणा करण्याचा सल्ला दिला.
जामगाव येते गेल्यानंतर महिलेला अंगातील आत्मा बाहेर काढण्यासाठी काठीने मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतरही आत्मा बाहेर निघत नाही, असे म्हणत तिच्या अंगावर खिळे मारण्यात आहे. एक दोन नाही तर तब्बल दोन वर्षे हा अघोरी प्रकार सुरू होता. डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ पर्यंत हा अत्याचार सुरू होती. शेवटी छळ सहन न झाल्याने महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली आहे.

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

Leave A Reply

Your email address will not be published.