शाईफेक करून मराठा समाजावर नाव घालणे हा प्रकाश शेंडगेंचा स्टंट – प्रकाश शेंडगे यांनी केलेले आरोप मराठा समाजाने नाकारले

0 51

शाईफेक करून मराठा समाजावर नाव घालणे हा प्रकाश शेंडगेंचा स्टंट
– प्रकाश शेंडगे यांनी केलेले आरोप मराठा समाजाने नाकारले

जालना : ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या कारवर मध्यरात्री अज्ञाताने शाई फेक करून चपलांचा हार घातल्याची घटना घडल्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी या घटनेचा निषेध करीत हा प्रकार मराठा समाजातील काही जणांनी केल्याचा आरोप केला आहे. मात्र हे कृत्य मराठा समाज कदापीही करणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे यानी प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजावर केलेले आरोप नाकारले आहेत. यासोबत प्रकाश शेंडगे यांचाच हा स्टंट असल्याचा आरोप देखील मराठा समाजाने केला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार – मनोज जरांगे यांचा सर्व राजकीय पक्षांना इशारा

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
प्रकाश शेंडगे हे सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीकडून निवडणूक लढवीत आहेत. सांगलीतून माघारी घ्यावी यासाठी मराठा समाजाने हे कृत्य केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप आहे. मात्र या आरोपाचे खंडन करताना मराठा समाजाने म्हटले की, प्रकाश शेंडगे यांना सांगलीत कोण विचारत नाही. त्यांना चांगली प्रसिद्धी मिळत नाही. त्यांच्या बातम्या कोठेही दाखवले जात नाहीत. याच कारणातून प्रसिद्धी मिळण्यासाठी प्रकाश शेंडगे यांनीच हा स्टंट केला. या घटनेची पोलिसांनी देखील गांभीर्याने दखल घेतली असून दोन पथकांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. प्रकाश शेंडगे यांच्या ज्या कारवर शाही फेक आणि चपलांचा हार घालण्यात आला. ती कार संबंधित हॉटेलच्या सीसीटीव्ही कक्षेच्या बाहेर होती. त्यामुळे हे कृत्य कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचा सर्व अंगाने तपास सुरू आहे.

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट – संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद
पोलिसात अद्याप तक्रार का दिली नाही?
प्रकाश शेंडगे यांच्याकडून मात्र अद्याप या घटनेबाबत पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. इतकी मोठी घटना घडून देखील प्रकाश शेंडगे यांनी पोलिसात अद्याप तक्रार का दिली नाही? असा देखील आता सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच प्रकाश शेंडगे यांचाच हा स्टंट असून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रकार प्रकाश शेंडगे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप देखील मराठा समाजातील पदाधिकाºयांनी केला आहे.
स्टंट करून ओबीसींचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न
मराठा समाज असे कोणतेही कृत्य करीत नाही, ओबीसी उमेदवाराला सांगलीत कोणीहाी ओळखल नसल्याने त्यांनीच त्यांच्या समर्थकांकडून असे केले असावे. यापूर्वी देखील ओबीसी नेत्यांनी असे स्टंट करून मराठा समाजावर आरोप करून ओबीसींचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला पण गावात ओबीसी मराठा एक असल्याने यांचे स्टंट फेल जातात असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने ! ✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

Leave A Reply

Your email address will not be published.