महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार – मनोज जरांगे यांचा सर्व राजकीय पक्षांना इशारा

0 63

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार
– मनोज जरांगे यांचा सर्व राजकीय पक्षांना इशारा

बीड : मराठा समाजाच्या एकीमुळेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे. प्रत्येक टप्प्यात मोदींना महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावं लागत आहे. परंतु मराठ्यांना ६ जून पर्यंत या सरकारने आरक्षण दिले नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असून महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या इशाºयामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यातील सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने बीडच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलक जरांगे पाटील हे एकाच मंचावर आले होते. यावेळी केलेल्या भाषणात राज्य सरकारने तत्काळ सगेसोयºयांची अंमलबजावणी न केल्यास २८८ विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा करीत मनोज जरांगे पाटील यांनी मी स्वत: विधासभेच्या निवडणुकीत उभा राहीन, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट – संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद

नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही – हा त्यांचा बालिशपणा म्हणत छगन भुजबळांचे नाव ने घेता पंकजा मुंडेचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिर्डी येथे एकदा विनंती केली होती, तुमचा माणूस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतोय, खोट्या केसेस करतोय हे थांबवा. मराठ्यांना सग्या सोयºयातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी त्यांना दोनदा केली. मी पण क्षत्रिय मराठा आहे, आता पुन्हा विनंती करणार नाही. मराठ्यांना ६ जून पर्यंत आरक्षण दिले नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असून महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार
लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांना मराठ्यांच्या एकीची भीती
मराठ्यांच्या एकीची भीती स्पष्ट दिसत आहे इतर राज्यात काही टप्प्यांत लोकसभा निवडणुका घेतल्या. महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मोदी सभा घेत आहेत, याच्यातच आमचा विजय असल्याचा चिमटा मनोज जरांगे पाटील यांनी काढला.

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

Leave A Reply

Your email address will not be published.