छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट – संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद

0 921

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट
– संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद

छत्रपती संभाजीनगर : गावातील मद्य विक्रीची दुकाने बंद करावीत या मागणीसाठी अनेक गावात महिलांनी पुढाकार घेत बाटली आडवी केली. मात्र छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने असल्याने या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात दारू विक्रेत्यांचा सुटसुळाट अशा नव्या चर्चेला उधाण आले आहे. संदीपान भुमरे यांनी दिलेल्या शपथपत्रात मद्यविक्री परवाने व मालमत्ता भाडे हा उत्पन्नाचा स्रोत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे मद्य आणि व्यसनापासून समाजाला दुर करण्यासाठी शासन प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असताना इथे लोकप्रतिनींधीच्या घरातून जर मद्य विक्री होणार असेल आणि यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करणार असेल तर तरूण पिढीच्या भवितव्याचे काय हा प्रश्न सामान्य मतदारांपुढे पडला आहे.

लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचा नारायण राणेंना खडा सवाल

टाकळी येथील बुथवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड – १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलल्यानंतर मतदान सुरूळीत

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
संदीपान भुमरे यांनी आपल्या शपथपत्रात जंगम व स्थावर मालमत्ता व उत्पन्नाचा स्रोत सादर केला. स्वत: व पत्नीकडे जंगम व स्थावर सहा कोटी ६६ लाख ९३ हजार ९४६ रुपयांची संपत्ती दाखविली. तसेच, ४५ तोळे सोने, शेती व विधानसभा सदस्यत्वाचे मानधन, तसेच उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्यांच्या पत्नी पुष्पा भुमरे यांच्या नावे मद्यविक्रीचे दोन परवाने असल्याचे नमूद केले आहे. एकीकडे सामान्यांच्या घराची धुळधाण करणारी दारू बंद व्हावी यासाठी सामान्यांच्या घरातील महिला कंबरेला पदर खोचून पुढे येताना दिसत असताना मात्र राजकीय नेत्याच्या घरातील महिला दारू विक्रीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. राजकीय नेत्यांनी सर्वसामान्याची कुटुंबे देशोधडीला लावण्याचा विडा उचचला आहे का असा प्रश्न देखील मदारांकडून विचारला जात आहे.

शाईफेक करून मराठा समाजावर नाव घालणे हा प्रकाश शेंडगेंचा स्टंट – प्रकाश शेंडगे यांनी केलेले आरोप मराठा समाजाने नाकारले
संदीपान भुमरे यांचे शेती व विधानसभा सदस्यत्वाचे मानधन, मद्यविक्री (वाईन शॉप) परवाने व मालमत्ता भाडे हा उत्पन्नाचा स्रोत असल्याचे तिसº़्या शपथपत्रात दर्शविले आहे. यात मद्यविक्री परवाना हा त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. जालना तसेच जळगाव येथील हा परवाना असल्याचे यात नमूद आहे. भाजपच्या एका नेत्याने यापूर्वी मद्याच्या बाटलीला बाईचे नाव दिल्यास तिचा खप जास्त होईल असे विधान केले होते. त्यात आता भुमरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मद्य विक्रीच्या परवाने मोठी खळबळ उडाली आहे. जेव्हा दारूबंदीचा विषय येईल तेव्हा भुमरेसारखे राजकारणी कसे बोलतील, अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.
रावसाहेब दानवेंकडे २८ कोटींची संपत्ती
जालना लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याकडे सुमारे २८ कोटी ८८ लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याकडे १३ कोटी ७१ लाख रुपये अशी एकूण दानवे दाम्पत्याकडे सुमारे ४२ कोटी ६० लाख ३० हजार ६५२.१५ रूपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. शेती, खासदार पदाचे वेतन, भाडे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.

शांतीगिरी बाबाकडे ३८ कोटींचा खजिना
नाशिक लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र दाखल करणारे अपक्ष उमेदवार व जय बाबाजी भक्त परिवाराचे श्रद्धास्थान शांतीगिरी महाराज यांच्याकडे ३८ कोटी ८१ लाख ५३ हजार ५३३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. शांतिगिरी महाराज यांनी प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचे विवरण दिले असून, त्यात नऊ वाहनांसह अनेक ठिकाणी मठ, गुरुकुले, शेतीसारख्या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. या बााबाने आपली संपत्ती जाहीर केल्यानंतर याला मतदारांकडून खजिना म्हटल्या जात आहे.
बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही – हा त्यांचा बालिशपणा म्हणत छगन भुजबळांचे नाव ने घेता पंकजा मुंडेचा टोला

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

Leave A Reply

Your email address will not be published.