मुरुडमध्ये बोगस क्लासेसचा धुमाकूळ…! – कोचिंग क्लासेस जोमात, मात्र पालक आहेत कोमात..!

2 377

मुरुडमध्ये बोगस क्लासेसचा धुमाकूळ…!

– कोचिंग क्लासेस जोमात, मात्र पालक आहेत कोमात..!

 

मुरुड (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मुरुड शहरामध्ये बोगस क्लासेसचा सुळसुळाट असल्याची चर्चा पाहावयास मिळत आहे. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून फिसचे प्रमाण अतिरिक्त असल्याचे पहावयास दिसून येत आहे. एकाच्या नावाने कोचिंग क्लासेस चालवतात परंतु त्यामध्ये शासकीय नोकरी असतानाही घरीच क्लासेस चालू असल्याचे दिसून येत आहे. राहत्या घरी कोचिंग क्लासेस चालू करून त्याचा टॅक्सी शासनास भरावयास तयार आहेत की नाही ? ही बाब समोर येत आहे.

संविधानावर दरोडा घालू पहाण-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचा नारायण राणेंना खडा सवाल

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शिक्षणासाठी प्रचलित असलेले मुरुड गावात आसपास ५० खेड्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात चांगल्या आणि उच्च दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था ,शाळा, कॉलेज या गावात आहेत ,ही एक अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. परंतु याचं गावात शिक्षणक्षेत्रात अनेक काळे धंदे उदयास आले आहेत ,अनेक शिक्षक आणि काही क्लासेस संचालक यांची अभद्र युती होऊन क्लासेस क्षेत्रात लाखो रुपयाचा चंदा येथील काही सरकार मान्य संस्थेतील शिक्षक पगार मिळत असतानाही वाम मार्गाने खाजगी क्लासेस घेऊन कमावत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सरकारी, खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असताना एकाच्या नावे खाजगी क्लासेस घेऊन लाखो रुपये कमवतात. दरम्यान या अशा शिक्षकांना खाजगी कोचिंग क्लासेस शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमधील शिक्षकांना अशाप्रकारच्या शिकवण्या घेण्यास सक्त मनाई आहे. तसेच या परिपत्रकानुसार सर्व शाळांतील मुख्याध्यापकांनी शिक्षकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे , परंतु कायद्याला पायदळी तुडवून आमचे कोणीच कधीच करू शकत नाही अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत तोंडी परीक्षेत मिळणाऱ्या २० मार्काच्या धमक्या देऊन विशेष खाजगी क्लासेस मध्ये प्रवेश घ्यायला भाग पाडले जात आहे. काही असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे काही बायकांच्या नावावर कोचिंग क्लासेस चालविणारे शालेय शिक्षक शाळा व महाविद्यालयातील परमनंट शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील काही अधिकारी यांची मिली भगत होत आहे की काय ? असे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे. तसेच अशा अनेक शंका पालक वर्गातून व्यक्त केल्या जात असून विशेष पक्षाचे मतदार म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची काही लोकप्रतिनिधी उघडपणे मदत करत आहेत असेही प्रश्न निर्माण होत आहेत ?

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

शाईफेक करून मराठा समाजावर नाव घालणे हा प्रकाश शेंडगेंचा स्टंट – प्रकाश शेंडगे यांनी केलेले आरोप मराठा समाजाने नाकारले

मुरुड मध्ये आज रोजी जवळपास ३० ते ३५ शिक्षक हे कोणत्या ना कोणत्या शाळेत,महाविद्यालयात पर्मनंट असूनही ते खुलेआम मुरुड मध्ये खाजगी कोचिंग क्लासेस घेत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांच्या पाठीमागे नक्कीच राजकीय नेत्यांची वरदस्त आणि अधिकाऱ्यांची आशीर्वाद असल्याशिवाय खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात का ? अशी शंका पालकांमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात मुरुड व मुरुड परिसरातील चर्चिली जात आहे तेव्हा प्रशासक काय पाऊल उचलेल याकडे नागरिकाची व पालकाचे लक्ष केंद्रित होत आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी यांना अनेक वेळा अशी निवेदन देण्यात आली असूनही अद्यापही कारवाई झाली नसल्याचे बाब समोर येत आहे. अशा विविध प्रकारच्या चर्चा मात्र नागरिकांमध्ये व पालकांमध्ये होत आहेत.

2 Comments
  1. तुझा says

    ही बातमी लावायला तु कीती पैसे घेतले ते सांग .

    1. Gramonnatti says

      Tu Kiti Dile

Leave A Reply

Your email address will not be published.