काव्याच्या मृत्यूला आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा जबाबदार – सरपंच अरविंद ठाकरे यांची थेट रुग्णालयात धडक

0 93

काव्याच्या मृत्यूला आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा जबाबदार

– सरपंच अरविंद ठाकरे यांची थेट रुग्णालयात धडक

मारेगाव (लहू जीवतोडे) : चौदा महिन्याच्या काव्याचा वेळेवर उपचार झाला असता तर ती सुदैवाने बचावली असती. परंतु आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्या चिमुकलीचा जीव गेला. यास जबाबदार ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यास असलेले अधिकारी, कर्मचारी असल्याचा आरोप यावेळी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी थेट ग्रामीण रुग्णालयात धडक दिली असता उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी व वैधकीय अधिकारी यांचे समोर ठाकला आहे.

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

एका १४ महिन्याच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे मंगळवारच्या पहाटे घडली. कु. काव्या वैभव खेवले असे उपचारा अभावी वाटेतच मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक काव्या ही आपल्या आई सोबत झोपेत असतांना मद्यरात्री मण्यार जातीचा विषारी साप त्यांच्या अथरुणात शिरला असता, त्या विषारी सापाने काव्या ला दंश केला. काव्याचे रडणे ऐकून आई सह कुटूंबातील व्यक्ती जागी झाले असता त्या विषारी सापाने काव्याला दंश केल्याचे उघडकीस येताच तत्काळ तिला ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे भरती केले. परंतु कर्तव्यास असलेले आरोग्य अधिकारी चक्क अर्धा तास उशिरा पोहचल्याने अभावी काव्यावर वेळेवर प्राथमिक उपचार होवू शकला नाही. दरम्यान तिला रेफर केले असता वणी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला चंद्रपूर येथे तत्काळ हलविण्याचा सल्ला डॉक्टर नी दिल्याने चंद्रपूर येथे नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

उज्ज्वल निकम यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल – माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचा घणाघात

आपत्काळी नेहमी अर्ध्या रात्री नागरिकांच्या मदतीला धावुन जाणारे आपल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अपघात, डिलिव्हरी, विष प्राशन आदी सारख्या शेकडो रुग्णांचे प्राण वाचविणारे असे कुंभा येथील कर्तव्यदक्ष सरपंच अरविंद ठाकरे यांनी या घटनेची दखल घेत थेट मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाच्या कार्यलयात धडक दिली असता येथील आरोग्य यंत्रणेवर या घटनेचा रोष व्यक्त करत जाब विचारत काव्या च्या मृत्यूला कर्तव्यास असलेले अधिकारी, कर्मचारीच जबाबदार, जर तत्काळ तिच्यावर प्राथमिक उपचार झाला असता तर नक्कीच सुदैवाने बचावली असती असा थेट आरोप करत सरपंच अरविंद ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व कर्तव्यास असलेले अधिकारी डॉ. गणेश बावनथले हे चक्क अर्धा तास उशिरा आल्यानेच प्राथमिक उपचारा अभावी त्या चिमुकलीचे प्राण गेल्याच्या आरोपाखाली वैधकीय अधीक्षक डॉ. सुभाष इंगळे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे यांचेकडे कारवाई ची मागणी केली आहे.

भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाला खोडा घातला – पंतप्रधान मोदींवर इतकी वाईट वेळ, स्वत:चे चिन्ह सोडून दुसºयाच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ मनोज जरांगेंचा भाजपला टोला

आरोग्य सेवा थंडावली असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळतं नसल्याने रेफर दरम्यान त्यांचे प्राण जात आहे. यात आरोग्य प्रशासन स्पेशल फेल पडत असल्याने जर प्रशासनाने रुग्णालय माझ्याकडे दिले तर मी एकाही रुग्णांचा जीव जावू देणार नाही.अशी आरोग्य प्रशासनावर टीका करत सरपंच अरविंद ठाकरे यांनी यावेळी आपली खंत व्यक्त केली.

रुग्णालयात १३ पदे रिक्त 
रुग्णालयात ३ वैधकीय अधिकारी, १ दंतशल्य चिकित्सक, ३ अधिपरिचरिका, १ प्रयोग शाळा तंत्रज्ञ, १ क्ष- किरण तंत्रज्ञ, १ औषध निर्माण अधिकारी, १ सा. अधीक्षक, १ क. लिपिक, १ प्रयोगशाळा साहाय्यक असे एकूण १३ पदे रिक्त आहे. कर्मचाऱ्याची कमतरता व सध्या विशेष स्पेशालिस्ट डॉक्टर नसल्याने, सुविधा उपलब्ध नुसार रुग्णांवर उपचार केला जातो. त्यामुळे अपघात, सर्पदंश, विषप्राशन, डिलिव्हरी आदी सिरियस पेशंट वर प्राथमिक उपचार करुन पुढील सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना रेफर केल्या जाते, असे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. सुभाष इंगळे म्हणाले.

संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

Leave A Reply

Your email address will not be published.