जहाँ डर हैं, वही कोरोना क्यो हैं ?

पुनावाला यांनी तयार केलेलं वॅक्शिन लोकांना बळजबरीन देऊनही एकनही त्यांचा लोकांना फायदा होताना दिसत नाही कारण, ठाणे येथिल मनोरमा नगरमध्ये राहणाऱ्या सुखदेव किर्दत यांनी भिवंडी येथे त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रतिक्षा गृहात थांबले असता चक्कर आली त्यानंतर त्यांना भिवंडी येथिल जिल्हा उपकेंद्रात नेले असता तेथिल डाक्टरांनी मयत घोषित केले.

0 307
जहाँ डर हैं, वही कोरोना क्यो हैं ?

 

नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२

‘जो डर गया समझो ओं कोरोना से मर गया !
और टेस्ट नहीं की, तो ही कोरोना पाॅझिटिव्ह आ गया !’
कोरोना या राजकीय षडयंत्रानं अनेकांची घर उध्वस्त केली तर अनेकांना खाण्यासही मुश्किल केल. अनेकांचे हातचे रोजगार गेले तर अनेकांना या षंढयंत्रामुळे रोजगार निर्मीतीचं साधन बनलं. अमरावतीत तो धंदा जोरदार चालतोय याची प्रचीती आली ती अशी, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह अशी ऑफर अमरावती जिल्ह्यातील एका लॅबकडून दिली जात असल्याचं समोर आलं आहे. एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. ती क्लिप केव्हाची आणि कुठली हे जरी स्पष्ट नसलं तरी अमरावतीसह महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लॅब डॉक्टर एका युवकाला सांगतोय की, “ज्यांनी पेटीएमचा कोरोना इन्शुरन्स काढला आहे अशा तरुणांचे नंबर पाठव, आपण त्याला पॉझीटिव्हचा रिपोर्ट देऊ आणि चार दिवस भर्ती करु आणि त्यांनतर त्याला क्लेम मिळवून देऊ. तसेच काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावतीत एक रॅकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच पुण्याच्या एका इन्शुरन्स कंपनीने अमरावती आणि अकोला येथे साडेतीन कोटी रुपये कोरोना इन्शुरन्स क्लेम मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(एबीपी माझा २५ फेब्रु २१) याविषयी बोलताना प्रशांत साबळे म्हणाले होते की, “कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे तपासण्यासाठी मी लॅबमध्ये गेलो. त्यावेळी एका डॉक्टरने तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह करायचा की निगेटिव्ह अशी विचारणा केली. त्यावेळी ही बाब माझ्या लक्षात आली नाही. त्यांनी हे शब्द कसे काय वापरले असं मला दोन दिवसांनी लक्षात आलं. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, पॉझिटिव्ह नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह देतात. चौदा दिवस क्वॉरनटाईन करतात, पगारी रजा घेतात, तीन हजार रुपये भरुन कोरोना विमा पॉलीसीमधून निम्मे पैसे वाटून घेतात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मांडला.”
काही दिवस गायब झालेला कोरोना दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात कसा दिसला नाही ? कारण येथिल एकाही शेतकऱ्याला कोरोणाची लागण झालेली नाही. तसेच
मागिल दोन तीन महीन्यांपासून पंजाब व हरियाणा येथिल शेतकरी आंदोलन करताना दिसत आहेत पण तिथे कोणालाच कोरोनाची लागण झाली नाही, ही बातमी आजपर्यंत प्रसारमाध्यमांनी दिली का ? तर दुसरीकडे पुनावाला यांनी तयार केलेलं वॅक्शिन लोकांना बळजबरीन देऊनही एकनही त्यांचा लोकांना फायदा होताना दिसत नाही कारण, ठाणे येथिल मनोरमा नगरमध्ये राहणाऱ्या सुखदेव किर्दत यांनी भिवंडी येथे त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रतिक्षा गृहात थांबले असता चक्कर आली त्यानंतर त्यांना भिवंडी येथिल जिल्हा उपकेंद्रात नेले असता तेथिल डाक्टरांनी मयत घोषित केले. (लो.आॅ. ०२ फेब्रु २१) त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की, लस घेतल्यानंतरही मृत्यूच येणार  असेल तर लस न घेतलेली बरी ? हे लोकांना पडलेला प्रश्न योग्य वाटतो. कारण सरकारला आजपर्यंतच्या सर्व प्रश्नांवर आलेलं अपयश झाकण्यासाठी लाॅकडाऊन करण्याचे प्रयत्न सरकार करताना दिसत आहे. पण याचा थोडासा विचार केला तर समजेल की,  देशात जे शेतकरी आंदोलन चालू आहे ते हाणुन पाडण्याचे प्रयत्न सरकारने केले पण त्याला यश आले का ? आज लोक पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे त्रस्त आहेत ते त्याविरोधात आंदोलन करतील याची सरकारला धास्ती असावी,  सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार नाही आणि जो रोजगार होता तो लाॅकडाऊनच्या काळात गेला त्यामुळे सामान्य तरूण बेरोजगारीचा विषय घेऊन रस्त्यावर उतरू नये यासाठीच सरकार पुन्हा लाॅकडाऊन करते का ? तसेच घरगुती वस्तुंचे वाढलेले दर, बीज बिलाविरोधात शेतक-यांनी घेतलेला उठाव, लाॅकडाऊनच्या काळात शाळा बंद असतानाही शाळांनी आकारलेली शैक्षणिक फीच्या विरोधात पालकांमध्ये प्रचंड चिड आहे त्याविरोधात लोक ररस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे सरकारनं प्रसारमाध्यमांना हाताशी धरून कोरोनाची दुसरी लाट आली असं नवीन नाटक करून लोकांना परत एकदा कोरोनाच्या संभ्रमात ढकलण्याचे काम केले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
आज कोरोना एक राजकीय षडयंत्र आहे असं बोलण्याचा लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याला या देशातील मनुवादी सरकार व त्यांचे बांडगुळ देशद्रोही बोलताना दिसत आहेत.
काल परवा पोहरादेवी येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी हजारोंच्या संख्येनं दर्शन घेतलं त्यावेळी कोरोना विषाणू त्या लोकांच्या गर्दीला भिऊन कुठे दुर गेला असेल का ? कारण राजकीय नेत्यांच्या सभा बैठका प्रचार दौरे व्यवस्थित पार पाडताना दिसतात तेव्हा कोरोनाचा विषाणू कहर माजवताना दिसत मात्र शाळा काॅलेज मध्येच कोरोना विषाणू कसा काय दिसतो ? त्यामुळे लोकांनी विचार करावा की, खरंच हे कोरोना एक गौडबंगाल. असा प्रश्न सामान्य तरुण सोशल मीडीयाच्या माध्यमातून सरकारला विचारू लागले तेव्हा तीन चार दिवसांनी पोहरादेवी येथिल महंत व भक्तांना कोरोनाची लागण झाली ही बातमी आली तेव्हा हा प्रसारमाध्यमांनी केलेला लाळघोटे म्हणावा की योगायोग ?  तसेच पंजाबमध्ये मागण्या पूर्ण होईपर्यंत आशा कामगार आणि सुविधादारांनी कोरोना लसीवर बहिष्कार घातला आहे. या संदर्भात आशा वर्कर आणि फॅसिलिटेटर युनियनने आपले मागणी पत्र सिव्हिल सर्जनमार्फत पंजाब सरकारला पाठविले आहे. (जागरण ११ फेब्रु. २१) हा महीलांनी घेतलेला खरच एक घाडसी निर्णय आहे. तरूणांना कोरोना एक षंढयत्र आहे हे आमच्या बहुजन समाजातील तरुण ओळखतो आहे म्हणून तर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत त्यात हर्षद रूपवते हे त्यांच्या फेसबुक पेजवर म्हणतात की, जैसे EVM ने देश के लोकतंत्र का सत्यानाश किया वैसेही ‘वॅक्सीनेशन’ लोगों की सेहत का सत्यानाश करेगा..! शेवटी सांगतात की, ‘समझनेवालो को इशारा काफी है।’
आजपर्यंत अनेकांनी कोरोनावर औषधी व आयुर्वेदीक इलाज आहे असं अनेकांनी स्वत:च ज्ञान पाजळलं त्यात (अंबादास) मनोहर कुलकर्णी यांनी तुप आणि नाकाचा सिध्दांत मांडला तर चंदनतस्कर रामदेव बाबाने आश्वगंधा अन् पैसा गोळा करण्याचा धंदा केला आणि आता कोरोनीलचा बाजार मांडून पैसा गोळा करण्याचा प्रयत्न केला पण तो शंभर टक्के फसला आहे म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
‘रामदेव बाबाने आधी
करोना पाॅझिटिव व्हावा,
मग कोरोलीनचा प्रयोग
स्वतःवरच करावा !’
तसेच मेरे प्यारे भाई और बहनो चा नारा देऊन सरकारच्या मालमत्तेचे खाजगीकरण करण्यात पटाईत असणा-या नरेंद्र मोदींनी ताट वाटी दिवे बत्तीचा जागतीक सिध्दांत जगासमोर ठेवून आपल्या अल्प बुद्धिचं प्रदर्शन केलं, कधी पोपटपंची करून तर कधी मोराला नाचवून भक्तांना संघाच्या घाणीत नासवून टाकलं म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
‘मोदिजी तुम्ही …
मास्क घाला की न घाला
पण तोंडाला मात्र
जरूर लगाम घाला !’.
वॅक्सीनची लस घेऊन होणारे दुष्परिणाम सर्वांसमोर दिसले अाहेत, लस घेऊनही कोरोनाची लागण होतेय मग कोरोना खोटा की लसच खोटी ? पण नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लस घेतली तेव्हा त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता मग प्रश्न पडतो की लोकांना मास्क वापरा अन् दोन मीटरचे अंतर ठेवा असं सांगणारे नरेंद्र मोदी आता काय त्याचं वाक्य विसरले का ? जो व्यक्ती बोलतो तो प्रत्यक्षात तसे वर्तन करत नसेल तर अशा व्यक्तींसाठी प्रा. गंगाधर बनबरे हे म्हणाले होते की, बोले तैसा थोडा थोडा चाले त्याची वंदावी पाऊले, पण बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पाऊले. म्हणून तर विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
‘लबाड किंग मोदींची
खात्री देईल कोण ?
कोरोना लस घेतली की
टाॅनिकचे इंजेक्शन ?’.
कोरोनाचा प्रसारमाध्यमांनी केलेले जास्तीच्या गवगव्यामुळे संभ्रमित व भयभित वातावरण निर्मिती झाली त्यामुळे विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, एका अदृश्य शत्रूशी आपण लढत आहेत कोरोना रोखण्यासाठी मास्क लाला, हात धूवा आणि सुरक्षित अंतर ठेवा ही त्रिसूत्री पाळा आणि कोरोना टाळा असे ते म्हणाले मग त्यांना एक साधा प्रश्न विचारावा वाटतो की, तुम्ही एका ठिकाणी म्हणाला होतात की, गणपती पाहीजे त्याला पुत्रप्राप्ती देतो’ तर मग तुमचा पाहीजे त्याला मुलं वाटणारा विघ्नहर्ता गणपती कोरोनाच्या एका अदृश्य विषाणूचा नायनाट का करत नसेल ? मग आम्ही विघ्नहर्ता काय म्हणून म्हणावे ? त्यामुळे बहुजन समाजाला सांगणं आहे की, दलाल मिडीया आणि त्यांनी दाखवलेल्या कोणत्याही बातम्यांवर लक्ष ठेवू नका कारण त्यांनी जसा पैसा पुरवला जातो तशी बातमी तुम्हाला दाखवली जाते, कोरोनाच्या भितीने मरण्यापेक्षा सरकारने केलेली महागाई, तरुणांचा हातचा गेलेला रोजगार आणि त्याला कारणीभूत असणारी व्यवस्था, इतिहासाचे होणारे विकृतीकरण त्यांचे विषारी सर्प, सरकारने राबविलेले शेतकरी विरोधी कायदे त्यांचे फायदे काय ? त्यांचे भविष्यातील धोके समजून घ्या आणि ते बहूजन समाजातील शेवटच्या घटकाला समजून सांगताना आलेलं मरण हे कोरोनाच्या व तिच्या लसीच्या मरण्यापेक्षा कितीही चांगलं असेल त्यामुळे वेळीच सावध व्हा अन्यथा तुमचं मरण कोरोनाच्या लसीकरणातून निश्चित आहे हे मात्र नक्की.
‘गर्दी करणा-या भक्तांना कोरोना होत नसेल तर 
एकांतात राहुन कसा काय होत असेल ?’
Leave A Reply

Your email address will not be published.