खारघर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी काहीच खालले नव्हते पोस्ट मॉर्टम अहवाल

0 44

खारघर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी काहीच खालले नव्हते पोस्ट मॉर्टम अहवाल

 

खारघर : दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खालले नव्हते , असे पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्ले होते की नाही ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती भयावह असू शकतो हे दिसून आले. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट अ‍ॅक्शन प्लान तयार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला जबाबदारी सोपवली असून त्याचा अहवाल लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे.

यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणे आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणा-याा एका डॉक्टरनं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणीसाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास झाला. पण ही महत्त्वाची बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही, असं एका अधिका-याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.