पाटणी चौकाला शहीद जवान अमोल गोरे यांचे नाव देण्यात यावे संभाजी ब्रिगेडची मागणी

0 232

पाटणी चौकाला शहीद जवान अमोल गोरे यांचे नाव देण्यात यावे संभाजी ब्रिगेडची मागणी

 

वाशिम : जिल्ह्याचे सुपुत्र शहीद अमोल गोरे हे कर्तव्यावर असताना देशासाठी कामी आले. त्यांच्या शहीद होण्यामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात हळहळ पसरली असताना वाशिम शहरातील पाटणी चौकाला शहीद स्व. अमोल गोरे स्मृती चौक हे नाव देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे केली आहे.

याबाबत जिल्ह्याचे सुपुत्र सोनखास येथील रहिवासी हे सैन्य सेवेत असताना अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर असताना आपल्या सहकार्याचा जीव वाचवताना शहीद झाले.
काल त्यांच्यावर शासकीय इतमामात व लाखोंच्या जनसमुदाय समक्ष अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे जन भावनेचा आदर लक्षात घेता प्रशासनाने वाशिम शहरातील पाटणी चौकाचे नामकरण शहीद स्वर्गीय अमोल गोरे चौक असे करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने एका लेखी निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

यावेळी उपस्थित होते निवेदन देतेवेळी
संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, संभाजी ब्रिगेड विभागीय उपाध्यक्ष नितेश पोकर, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव शेख ईसाक, दत्ता ठाकरे, प्रभू काका भोयर, व इतर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.