पुन्हा महामारी येणार? – चीनकडून आयसीयू बेडची संख्या वाढवण्यावर भर

0 61

पुन्हा महामारी येणार?
– चीनकडून आयसीयू बेडची संख्या वाढवण्यावर भर

शांघाय : चीनमध्ये नुकतेच कोरोनाने मोठे नुकसान केले आहे. या देशात कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चीनने आता साथीच्या आजारामुळे होणाºया मृत्यूंपासून धडा घेतला आहे. चीनच्या अनेक एजन्सींनी सोमवारी देशातील आयसीयू बेडची संख्या वाढवण्यावर भर दिला. एका एजन्सींने त्यांच्या प्रस्तावात म्हटले की, २०२५ पर्यंत देशातील आयसीयू बेडची संख्या १००,००० लोकांमागे १५ आणि २०२७ पर्यंत १८ असावी, असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा नवी महामारी येणार का अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये जे घेतले ते आपलं दुर्भाग्य आहे – अभिनेता श्रेयश तळपदे यांचे खळबळजनक वक्तव्य

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा
चीनमधील अनेक एजन्सींनी सोमवार रोजी संयुक्त निवेदन जारी केले. एजन्सींनी आपल्या शिफारशीत म्हटले की, देशातील प्रति १००,००० लोकांमागे आयसीयू बेडची संख्या 2025 च्या अखेरीस १५ आणि २०२७ च्या अखेरीस १८ असावी. राष्ट्रीय आरोग्य आयोगासह अनेक संस्थांनीही त्यांच्या शिफारशींमध्ये रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. एजन्सीने म्हटले की, परिवर्तनीय-क्षमतेच्या आयसीयू बेडची संख्या २०२५ पर्यंत प्रति १००,००० लोकांमागे १० आणि २०२७ पर्यंत १२ पर्यंत पोहोचली पाहिजे, असे म्हटले आहे.

कोरोनाची लस घेऊन मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा डीएनए – डीएनएमध्ये कर्करोग होण्याची क्षमता असल्याची शास्त्रज्ञांमध्येही चर्चा
२०२१ मधील बेडची आकडेवारी
शांघायच्या फुदान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये चीनमध्ये प्रति १००,००० लोकांमागे केवळ ४.३७ आयसीयू बेड होते, २०१५ मध्ये यूएसमध्ये ३४.२ होते.
आयसीयू बेडच्या संख्येत वाढ
सार्वजनिक आरोग्य उपायांचा एक भाग म्हणून चीनने अलीकडच्या काळात आयसीयू बेडची संख्या काहीशी वाढवली आहे. मात्र, देशाची लोकसंख्या लक्षात घेता चीनला याप्रकरणी टीकेला सामोरे जावे लागत आहे. अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे की देशाची आरोग्य व्यवस्था अजूनही कमी संसाधने आहे.

कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास, त्यामुळे मी लस घेतली नाही – आमदार प्रणिती शिंदे यांचेकडून लस न घेतल्याची कबूली

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

Leave A Reply

Your email address will not be published.