लस पुर्णपणे सुरक्षीत असल्याचा पुनावालांचा खोटा दावा ? नागपूर खंडपीठाची अदर पूनावालांना नोटीस

0 572

लस पुर्णपणे सुरक्षीत असल्याचा पुनावालांचा खोटा दावा ? नागपूर खंडपीठाची अदर पूनावालांना नोटीस

 

नागपूर : सीरम इन्स्टिट्यूट आणि अदर पूनावाला यांना अव्हेकन इंडिया मुव्हमेंटच्या सदस्यांविरुद्ध खोटा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी नागपूर खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खोटा दावा करून या लसीवर बंदी का घालू नये असा प्रश्न विचारत कारणे दाखवा नोटीस बजावली. डॉ. स्नेहल लुनावत यांच्या कोविशील्डमुळे झालेल्या मृत्यूची पूनावाला आणि बिल गेट्स यांना १०,००० कोटींच्या नुकसान भरपाई मागितली आहे.

घातक आजार ? हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, सांधेदुखी, अंधत्व, बहिरेपणा, मधुमेह, किडनी निकामी होणे, कर्करोग, त्वचारोग, मेंदूच्या (न्युरोलॉजिकल) समस्या, कोणत्याही रोगाशी लढण्याची क्षमता कमी होणे, कोरोनापेक्षा लसीमुळे होणारे मृत्यू असे शोधनिबंध आणि जगभरातून तक्रारी येत आहेत असे याचिकेमध्ये म्हटले आहे.

अशाच कारणांमुळे २१ युरोपीय देशांनी कोविशील्डवर बंदी घातली आहे. पण अदर पूनावाला आणि त्यांचे भागीदार बिल गेट्स यांच्यासह देशाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासारख्या भ्रष्ट व्यक्तींनी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे खोटे बोलून अनेक वेळा जबरदस्तीने लसीकरण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.