पागोटे येथिल सि.डब्ल्यु.सी द्रोणागिरी कंपनीत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ युनियन स्थापन

0 143

पागोटे येथिल सि.डब्ल्यु.सी द्रोणागिरी कंपनीत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ युनियन स्थापन

 

रायगड : जिल्ह्यातील उरण तालुक्यात पागोटे येथिल सि.डब्ल्यु.सी द्रोणागिरी नोड या कंपनीमध्ये लोकल लेबर कामागारांनी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियन स्थापना करण्यात आली.

स्थापन केलेल्या युनियनच्या नाम फलकाचे उद्घाटन मा. गणेश यशवंत पाटील साहेब, रायगड जिल्हाध्यक्ष यांनी केले. याचे अध्यक्षक व मार्गदर्शन म्हणून मा. संजय धर्मा घरत साहेब, रायगड जिल्हा महासचिव तथा ‘खोतांचा कर्दनकाळ आप्पासाहेब नारायण नागू पाटील’ या पुस्तकाचे लेखक यांनी केले हे होते.

मालक आणि कामगार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे दोघांनीही एकमेकाला समजून घेणे गरजेचे असते. आपली युनियन ८५० पेक्षा जास्त ट्रेडमध्ये काम करते, त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण आली तर युनियन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे विचार मा. संजय धर्मा घरत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात युनिट अध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, उपाध्यक्ष नरेश पाटील, उपाध्यक्ष दिनेश पाटील, खजिनदार जितेंद्र पाटील, सचिव शुभम पाटील, सदस्य दौलत पाटील, योगेश पाटील, भुषण तांडेल, रवी तांडेल, सुरज ठाकूर, पंकज तांडेल, विजय पाटील, नितीकेश पाटील इतर कामगार तसेच कॅान्टीनेंटल कंपनीचे युनिट अध्यक्ष सुधीर ठाकूर, ट्रान्स इंडीया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व इतर कंपन्यांचे कामगार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.