कोक्ता येथिल उड्डाणपुलावर असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर फाडल्याप्रकरणी महीला आक्रमक

0 218

कोक्ता येथिल उड्डाणपुलावर असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर फाडल्याप्रकरणी महीला आक्रमक

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे ): तालुक्यातील घाटपुरी येथे काल परवाच काही समाज कंटकांकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात लावलेल्या होल्डिंवर शेण फेकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यात आता घाटपुरी जवळच असलेल्या कोक्ता ता. खामगाव येथिल उड्डाणपुलावर लावलेले ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल’ असे नाव असलेले बॅनर फडल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे येथिल महीलांनी आक्रमक पवित्रा घेत बॅनर फाडणारांचे हात कापा अशी मागणी केली.

कोक्ता या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घाटपुरी गावात काल दि. २१ एप्रिल रोजीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेची विटंबना केल्याचा प्रकार झाल्यानंतर आज दुस-याच दिवशी कोक्ता येथिल उड्डाणपुलावर असलेले ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल’ हे नाव असलेले बॅनर फाडल्याचा प्रकार झाला आहे‌. महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांची लोकप्रियता कमी करता येऊ न शकल्याने त्यांच्या नावाची आणि फोटोची बदनामी करण्याच काम आज या महाराष्ट्रात करून जातीय दंगली घडवण्याचा ज्या मनुवादी विकृतींनी आखला आहे तो कदापीही शक्य होणार नाही. कारण असे बॅनर फाडाफाडीचे प्रकार केवळ जातीय दंगली घडवण्याच्या उद्देशाने केले जातात असं येथिल नागरिक म्हणत होते.

बुलढाणा हा परिवर्तनवादी विचारांची मांदीआळी असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र या जिल्ह्यात मागिल अनेक दिवसांपासून महापुरुषांच्या विचारांना काळीमा फासून जातीय दंगली घडवण्याचे कटकारस्थान विकृतींची टोळी करत असल्याचा अंदाज येत आहे.

घाटपुरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेल्या होल्डिंगवर शेण फेकल्याचा घटनेला दोन दिवस होण्यापूर्वीच मोक्ता येथिल उड्डाणपुलावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल असे नामकरण असलेले बॅनर दोन्ही बाजूने लावले होते मात्र त्यातील एका बाजूचे बॅनर फाडल्याप्रकरणी महीलांनी पोस्टर काढणारांचे हात कापा अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.