मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात असून त्यांनी मुक्कामासाठी सात आठ गोधड्या आणल्या आहेत – भाजपच्या नेत्यांमुळे मोदींवर वाईट वेळ मनोज जरांगे पाटलांकडून मोदी भाजपची धुलाई

0 415

मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात असून त्यांनी मुक्कामासाठी सात आठ गोधड्या आणल्या आहेत
– भाजपच्या नेत्यांमुळे मोदींवर वाईट वेळ मनोज जरांगे पाटलांकडून मोदी भाजपची धुलाई

आष्टी : मराठा समाज कधीच भाजपच्या विरोधात नव्हता. पण यांनी आमच्या आई बहीणीचे डोके फोडले. यांनी आमच्या लाखो तरूणांवरती गुन्हे दाखल केल्याने मराठा वादळासारखा एकत्र आला. नरेंद्र मोदींना स्वत:चे चिन्ह सोडून प्रचार करावा लागला नव्हता पण राज्यातील काही भाजपच्या नेत्यांमुळे मोदींवर वाईट वेळ आली. या नेत्यांच्या मनात असलेला मराठा द्वेष याचा परिणाम मोदींना भोगावा लागला. आताची मोदींची परिस्थिी इतकी वाईट आहे की, मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात असून त्यांनी मुक्कामासाठी सात आठ गोधड्या आणल्या आहेत. सकाळी उठले की त्यांचे सुरू होते यालाच मराठ्यांचा डर म्हणतात. यापूर्वी केवळ ओबीसींच्या मताची गरज असल्याचे बोलले जायचे पण मराठा एक झाला तेव्हा मराठ्यांशिवाय राज्यातील पान पण हालत नसल्याचे बोलत असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी जोरदार धुलाई केली. ते तालुक्यातील अंभोरा गावात बोलत होते.


मराठा समाज कधीच एकत्र येत नव्हता तो समाज तुम्ही केलेल्या कष्टामुळे एकत्र आला आहे. मराठ्यांच्या एकीची भीती देशाला लागली आहे. मराठा एवढ्या ताकतीने एकत्र आला की या समाजाची दहशत देशावर बसली. ज्यांना कोणालाही या महाराष्ट्रात यायचे नव्हते, मराठ्यांच्या एकीपुढे सगळ्यांना गुडघे टेकावे लागले आहेत. मराठ्यांच्या एकीने चांगल्या चांगल्यांची बोलती बंद झाली. या महाराष्ट्रात पाच टप्यात कधीच निवडणूका झाल्या नव्हत्या. प्रत्येक टप्यात पंतप्रधानांना प्रचारासाठी आणावे लागत आहे इथेच मराठा सामाजाचा विजय आहे.
विहीर देणार नाही म्हणणाºया नेत्यांनो द्या तुमच्या एकट्याच्या आज्याला. तुमच्या काय बापाची जहागिरी आहे का ती केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. धमक्या देऊ नका चांगल्या चांगल्याच पाणीपत केले आहे, मराठ्यांना त्रास दिलात तर कार्यक्रमच लावीन. यांनी जर विहीरी आणि घरकुल दिली नाहीत तर यांच्या घराला वेढा टाकीन. या आमदार खासदार आणि मंत्र्याला स्वत:च्या नेत्यासाठी जातीच्या विरोधात जायचे सांगितले कोणी? जातीच्या विरोधात गेलात तर पुढच्या दहा पिढ्या मराठे कधीच गुलाल लागु देणार आहे. दुसºयांसाठी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, असा इशारा जरांगे यांनी दिला.

नरु सेठचा परिवार म्हणजे ‘पाॅर्न साईड बघणारे टोळके’ नवनाथ दत्तात्रय रेपे

नेत्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या चाटणा-यांना मनोज जरांगे यांचा विचार पचेल का? नवनाथ दत्तात्रय रेपे

मनोज जरांगे यांच्या भाषेने कंबरेखाली दुखापत का व्हावी? नवनाथ दत्तात्रय रेपे
भाजप नेते चंद्रकांत पाटील आयचा तेरे नाम… ते खेकड्यावाणी भांग पाडलेला…. नदीतला खेकडा असल्यावाणी तुला बोललो का रे गचपण्या मी काही. तो म्हणतो मराठ्यांना आरक्षण दिले. मनोज जरांगेला स्वत:ला प्रमाणपत्र पाहिजे होते. याच काय डोक फिरल की काय? मी कांगावा आणि गैरसमज पसरवतो. त्याची बोलण्याची टुनिंग इतकी डेंजर आहे की ते म्हणतो की, माझ्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले म्हणतो. अरे तु लोकांची कपडे घालून मोठा झाला तु माझ्या नादाला लागू नको. तुझा पंचा पिळला तर तुझा कार्यक्रमच करून टाकीन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी देताना म्हटले की, त्यांचा आवाज भंगार आहे त्या लोकांवाणी…. तो एवढा मुर्ख आणि खालच्या दर्जाचा आहे. तो म्हणतो ओबीसीतून आरक्षण देता येत नसतो म्हणतो. मग कशातून देतो? असा प्रश्न जरांगे यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला.
ाराठ्यांच्या नोंदी शोधण्याचे काम नेत्यांचे होते पण यांनी काहीच केले नाही. गोर गरीबांच्या संघर्षामुळे आरक्षण मिळाले. बाकीच्या जातीचे नेते त्यांच्या जातीचे नेते त्यांच्याकडून बोलत आहेत. आमचे जातीचे नेते त्यांच्या व्यासपीठावर बसलेले असताना ते मराठा ओबीसी वाद असल्याचे बोलतात. पंकजा मुंडे आणि राठोड यांच्यातील संवाद हा त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचे नसून आमचे त्यांच्या समोर माना खाली घालून बसतात. मराठ्यांची जात बदनाम होत असताना मराठ्यांच्या नेत्यांनी खाली उतरले पाहिजे. लक्षात ठेवा आम्ही संपलो की तुम्ही संपले म्हणून समजा असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व मराठा नेत्यांना देत तुम्ही मराठा समाजाचा अपमान का सहन करता असे प्रश्न विचारला. मी तुमच्याकडे कशाला आले हो माहित आहे का? मी कोणाला पाडा किंवा निवडणूक आणा म्हणलो का? पण यावेळी अस पाडा की त्यांचे पाच पिढ्यात कोण उभे राहिले नाही पाहिजे. त्यांचा नातू त्याला म्हणाला पाहिजे की माझ्या आज्याला मराठ्यांनी लय बेकार पाडले होते, असे म्हटले पाहिजे यासाठी पाडण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

चंद्रकांत पाटील तेरे नाम
अरे बाबा तुम्ही एवढे मोठे नेते लाजा तरी वाटल्या पाहिजेत. मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला तो तेरे नाम… आणि आम्हाला ज्ञान शिवकायला लागला. तुला आमदारकीला कचका दाखवतो, मराठ्यांच्या जिवावर मोठा होतो आणि आम्हाला सांगतो.
कोणा कोणाला आडवे यायचे असेल तर या
मराठ्यांच्या एकीपुढे ते भाबावून गेले आहेत त्यांनी मोदींना उलटा पटका घातला. त्या पटक्याचे शेपूट उलटे करून घातला एवढे भांबावून गेले. मोदी म्हणतात मागच्या दारातून आरक्षण घेतात अरं मागच्या दारातून नव्हे तर धडाधडा छाताडावर पाय देऊन ओबीसी आरक्षणात आलो. मी जिवंत असेपर्यंत आरक्षण देत नाही म्हणणाºया मोदींच्या समोर आरक्षण घेतले. राहिलेल्या मराठ्यांना सुध्दा ओबीसीतून आरक्षण घेणार कोणा कोणाला आडवे यायचे असेल त्यांनी यावे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
तेरे नामच्या जातीची कोल्हापूर जिल्ह्यात ६७ मत सुध्दा नाहीत
देवेंद्र फडणवीसांना सांगतो त्या तेरे नामला समजून सांगा. माझ्या नादाला लागणारांचे सर्वांचे टांगे पल्टी केले आहेत. खेकड्यासाखा भांग पाडणाराला माझ्या नादाला लागू नको म्हणून सांगा. ते पंधरा रूपयांचा बेल्ट घालणारा जामनेरचा गप्प केलाय याला गप्प करा. तेरे नामच्या जातीची कोल्हापूर जिल्ह्यात ६७ मत सुध्दा नाहीत. मराठ्यांच्या जिवावर सुरू असलेली वळवळी बंद करायला सांगा. यानंतर जर तो गप्प बसला नाही तर मी कोणत्याही स्थराला जाऊ शकतो. बाकीच्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे, असा इशारा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.