अंगार कोण अन् भंगार कोण ?

0 326
अंगार कोण अन् भंगार कोण ?
रेपे नवनाथ दत्तात्रय
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक 
मो. ९७६२६३६६६२

 

कोण आहे अंगार अन् कोण भंगार आहे ?
आम्ही ओळखल तुम्ही सर्वच भंगार आहे
निवडून दिलेले नेते अंगार अन् भंगार आहेत
खरी तर इव्हीएमच मशिनच खरी भंगार आहे.

 

महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोरोनाचे निर्बंध लावताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजपच्या वतीने जनआशिर्वाद यात्रा काढली जात आहे त्या यात्रेच कुठंच दोन फुटाच अंतर ठेवताना कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते दिसत नाहीत, ज्या आरएसएसचे स्वयंसेवक दोन फुटच अंतर न ठेवता दिवसाढवळ्या गळ्यातगळे घालून जोशिले खेळ व तोंडसुख घेतात हा त्यांचा इतिहास आहे त्यामुळे भाजपच्या राजकीय नेत्याकडून व भक्तांकडून दोन फुटाच्या अंतराची अपेक्षा करणं म्हणणं वाझोंट्या गायीकडून दुधाची अपेक्षा करण्यासारख आहे.
मोदी सरकारमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेले राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठड्यात जनआशिर्वाद यात्रा काढण्यात आली होती तेव्हा पहील्याच दिवशी परळी येथे या यात्रेचे हसू झाले कारण तिथे जमलेले स्व. गोपीनाथ मुंडे समर्थक पंकजा मुंडे अंगार हैं बाकी सब भंगार हैं ! अशा घोषणा देत होते तेव्हा या घोषणा ऐकूण पंकजा मुंडे संतापल्या तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना मुर्खात तर काढलेच पण त्यांची उंचीही मापली. तेव्हा प्रश्न पडतो की, तिथे तर सर्वच भाजपचे राजकीय नेते होते मग अंगार कोण ? आणि भंगार कोण ? कार्यकर्तेच नेत्यांना उंची देतात त्यामुळेच तर घराणेशाहीत वाढलेले नेते व त्यांची अर्धशिक्षित मुल मोठ्या उंचीवर मजल मारतात पण त्यांचीच उंची जर पंकजा मुंडे मोजत असतील ते योग्य आहे का ? तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली उंची पंकजा मुंडे विसरल्या का ?
भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालना जिल्ह्यात आली त्यावेळी बदनापूर येथे आयोजित सभेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे राहुल गांधीना बोलताना सांड तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना काम करणारा बैल अस म्हणाले. राहूल गांधीना सांड हा शब्द वापरल्यामुळे काँग्रेस – भाजपमध्ये वाद निर्माण झाला तोच दानवेंच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते विनायक राऊत संतापले तेव्हा ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा ‘सांड’ असा उल्लेख करणे दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे. याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. मोदींना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. (महाराष्ट्र देशा २२ आँगस्ट २१) कालपर्यत एकीकडे भक्त मोदींना शेर शव्वाशेर म्हणत होते अन् मोदींची छप्पन इंचाची छाती असलेले फोटो मिरवत अन् सोशल मिडियावर फिरवत होते तर त्याचेच काही भक्त त्यांची तुलना विष्णूशी करून त्यांना देवत्व बहाल करण्यात व्यस्त होते. त्यावेळी मात्र विरोधक मोदींची तुलना हिटलरशी करून त्यांना हिटलर ठरवत होते. परंतू कालच्या जनाअशिर्वाद यात्रेत खा. रावसाहेब दानवेंनी त्यांना चक्क बैल म्हटले त्यामुळे समाजात एक प्रकारचा हस्यकल्लोळ झाला. लोक सहजच म्हणू लागले की, छप्पन इंचाचा बैल अस म्हणून हसू लागले आहेत.
जालना येथे भाजपचे खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, शेतीमध्ये दोन प्रकारचे बैल असतात. एक काम करणारा बैल आणि एक काम न करणारा बैल. शेतकऱ्यांनी मला विचारलं की काम करणारा बैल मला समजतो. पण न काम करणारा बैल कोणता ? तेव्हा मी त्यांना सांगितलं की सांड बैल काम न करणारा बैल असतो. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे सांड बैल काम न करणारे. बैलाचे दोन प्रकार असतात, काम करणारा बैल आणि न काम करणारा बैल. सांड बैल म्हणजे न काम करणारा अस म्हणाले. म्हणून तर खा. रावसाहेब दानवे यांच नाव घेतल की, लोक हसतात अन् चिडतात कारण ते वांरवार बालीस वक्तव्य करतात यापुर्वीही ते पुलवामा येथे शहीद झालेल्या जवाणांना अतिरेकी अस बोलले होते ही भाजपची विकृत संस्कृती आहे हे स्पष्ट होत पण आता तर चक्क जालना येथे बोलताना नरेंद्र मोंदीची तुलना बैलाशी व राहुल गांधीची तुलना मोकळ्या सांडाशी करतात तेव्हा हसू येत. दानवेंच्या मतानूसार मोदी हे काम करणारे बैल असतील तर त्या बैलाच्या सोबत काम करणारे दानवे कोण ? त्यांना बैल अथवा खोंड का म्हणू नये ? आता तर ग्रामीण भागातील लोक एकांतात चर्चा करताना मोदींना व राहुल गांधींना बैलपोळा येण्याआधीच बैलपोळ्याच्या शुभेच्छा देताना अन् जोरजोरात हासताना दिसतात.
राहुल गांधींना दानवेंनी सांड म्हणताच काँग्रेसडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसतात त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही देखील रावसाहेब दानवेंना ‘म्हसोबाला सोडलेला बोकडा’ असल्याचे म्हणू शकतो. मात्र, ती आमची संस्कृती नाही. त्यामुळे आम्ही असे म्हणणार नाही.’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आदेशानेच गांधी घराण्याची प्रतिमा खराब करण्यासाठी ते असे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले. (महाराष्ट्र देशा २१ आँगस्ट २१) तेव्हा विलास औताडे यांना सागांव वाटत की, तुम्ही ज्या दानवेंना बोकड म्हणालात ते बोकड, सांड आणि बैल हे एकाच माळेचे मणी आहेत कारण स्व. गोपीनाथ मुंडे एका प्रचारसभेतील भाषणात म्हणाले होते की, अंदर बात हैं पुरी काँग्रेस अपने साथ हैं !.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटले की, गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे अशी घोषणा केली. (लोकसत्ता आँ. २२ आँगस्ट २१) तेव्हा नितेश राणेंना विचाराव वाटत की, एकीकडे खा. रावसाहेब दानवे मोंदींना बैल म्हणतात तर तुम्ही दुसरीकडे मोदींना ‘मोदी’ म्हणता तेव्हा सामान्य लोकांना प्रश्न पडतो की मोदींना दानवेप्रमाणे बैल का म्हणू नये ? आणि तुम्ही जी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी विशेष रेल्वे ‘मोदी एक्सप्रेस’ सुरू केली तीला मोदी एक्सप्रेस ऐवजी बैल एक्सप्रेस का म्हणू नये ? कारण भाजपचेच खासदार एकीकडे मोदींना बैल म्हणतात तर दुसरीकडे मोंदींना त्यांचेच लोक विष्णुचा अवतार म्हणून त्यांना देवत्व बहाल करतात तर सांबित पात्रा त्याना बाप म्हणतात तर दुसरीकडे चळवळीतील लोक मोदीचा उल्लेख फेकू किंवा झुटलर असा करतात त्यामुळे तुमचे भक्त गोंधळून जातील की, मोदींना आता मोदी, बैल, विष्णू, हिटलर, फेकू की झुटलर म्हणावे ? त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी एकत्रित बसून मोदी नेकमे कोण ? या विषयावर
चर्चासत्र अयोजित करायला काय अडचण आहे ? कारण मोदी नेमके बैल, विष्णू की फक्त मोदी ? हे स्पष्ट होईल तेव्हा कुठ तुमचे मंदभक्त संभ्रमातून थोडेसे बाहेर पडतील.
खा. नारायण राणे म्हणतात की, नरेंद्र मोदींनी केलेले कार्य लोकांना सांगण्यासाठी ही जनआशिर्वाद यात्रा आहे. तेव्हा या खा. नारायण राणेंना सागावं वाटत की, मोदींनी विकलेल्या व विक्रि काढलेल्या कंपन्या केलेली नोटबंदी तसेच त्यांनी केलेल खाजगीकीरण त्यांचे तोटे जर जनसामान्यांना समजली तर तुमच्याच जनआशिर्वाद यात्रेत सामान्य घरातील शिखलेले तरूण घुसून तुमच्या पुष्टभागावर फटके देऊन गावागावातून हुसकावून लावतील हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही. मराठवाड्यातील जनाअशिर्वाद यात्रेच परळीत अंगार भक्तांनी भंगार नेत्याचं हसू केल तर दुसरीकडे दानवेंनी मोदींना बैल केल. खा. नारायण राणे यांच्या पुढाकाराने कोकणात निघालेल्या जनआशिर्वाद यात्रेच रुपांतर थेट जेलयात्रेत झालं कारण त्यांच्या तोडांला लगाम नव्हता पण वेळीच त्यांनी लगाम घातला हे त्यांच्या तोंडानेच स्पष्ट दाखवल. त्यामुळे तर ते म्हणतात की, ‘मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. (मँक्स महा. २५ आँगस्ट २१) देशातील सरकारी मालमत्ता विक्री करण्यात ज्यांचे कोणीही हात धरू शकत नाही ते मा. मोदी हे छप्पन इंचाची छाती असलेले प्रधानमंत्री आहेत असं त्यांचे पिलावळ वारंवार म्हणत होती म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की, ‘माझ्या आज लक्षात आलं
56 इंच छाती कशी भरली
तर डोळे झाकून भक्तांनी
बैलाचीच मोजली छाती !’
बहुजन समाजाला शेवटी एकच सांगण आहे की, वाढती बेरोजगारी, चढत जाणारी महागाई, शेतकरी विरोधी काळे कायदे, इव्हीएम बंदी हे आपले मुख्य मुद्दे आहेत पण ह्या विषयाला बगल देण्यासाठी भाजप लोक जनआशिर्वाद यात्रा काढताना दिसतात तर महाविकास आघाडीचे लोक मध्येच काहीतरी तोडाफोडीच काम करताना दिसतात. मग खा. राणे समर्थक व ठाकरे समर्थक समोरासमोर येताना दिसले त्यावेळी मात्र त्या समर्थकाचे नेते व त्यांची मुल एसीत बसून तोडफोड बघत बसले होते ही वास्तिकता आहे पण आमच्या बहुजनातील तरूणांची अवस्था अशी झाली आहे की, ते बापापेक्षा नेत्याला प्रिय मानतात. पण सर्वच राजकीय पुढारी भंगार आहेत, कारण पुढारी अंगार होत आहेत केवळ त्या भंगार इव्हीएममुळे. मग हे अंगार व भंगार एकमेकात कुरघोडी करत बसतात मात्र लोकांचे मुळ प्रश्न सोडावायच्या नावाने या अंगार भंगाराची बोंबाबोंब दिसतेय हे बहुजन समाजाने लक्षात ठेवाव अन्यथा नेते अंगार ठरतील अन् तुम्ही तुमची मुलं भंगार ठराल त्यामुळे वेळीच सावध व्हा. कारण तुमची उंची त्या भंगार नेत्यांच्या उंचीपेक्षा खुप मोठी आहे ती ओळखा.
अंगार भंगार, ह्यांचा तो बैल अन् त्यांचा तो सांड ठरतो
विद्यार्थांच्या शाळा बंद असताना जनआशिर्वाद मागतो
कोण सांड कोण कामाचा बैल हा आमचा प्रश्न नाही ?
यात्रेत माहागाईचा विषय का नाही हा आमचा प्रश्न आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.