हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव – बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ

0 291

हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव
– बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ

मुंबई : कोरोनाच्या धसक्याने अनेकांनी लस घेतली पण सध्या कोरोना लस कोविशिल्डच्या दुष्परिणामांबाबतच्या ज्या बातम्या समोर येत आहेत त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनावर उपचार म्हणून घेतलेल्या लसीचा दुष्परिणाम होऊ शकतो अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनका या कंपनीने दिल्यानंतर अनेकांच्या मनात भीती बसली आहे. मात्र काही तज्ञ्जांच्या मते साईड इफेक्ट होण्यची क्षमता खुप प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. यातच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या मनातही भीती निर्माण झाल्याने त्यांच्या प्रतिक्रया चर्चेचा विषय ठरत आहे. यात आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यामध्ये काय होतं, याची कल्पना आपल्या कोणालाच नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट असल्याची प्रतिक्रीया अभिनेता श्रेयस तळपदे याने दिली आहे.

कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा

मलेरियाच्या लसीला जागतिक ‘आरोग्य संघटनेची मान्यता – सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने केले संशोधन

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार? – देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप
अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी १४ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आला होता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान त्याने हृदयविकाराच्या झटक्याशी कोरोना लसीचा संबंध नाही हे नाकारू शकत नाही, असे म्हटले. हृदयविकाराच्या झटक्याला लसही कारणीभूत ठरली असू शकते असेही त्याने म्हटले. त्याचबरोबर गायक बादशाहने एक व्हिडीओ शेअर करीत मला वाटलं मी को-वॅक्सीन घेतली आहे असे वाटत होते. मात्र, लशीच्या प्रमाणपत्रावर कोविशिल्डचे नाव दिसले. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला मैनू विदो करो.. हे गाणं वाजताना दिसत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे व गायक बादशाह याने लसीसंदर्भात दिलेल्या प्रतिक्रीयेनंतर अभिनेत्री रश्मी देसाईने देखील इन्स्टाग्रामवर म्हटले की, आता घाबरून जायचं नाही, टांगती तलवार तर अजूनही आहे. त्याशिवाय गौहर खानने देखील ‘हे ईश्वर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा

लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये जे घेतले ते आपलं दुर्भाग्य आहे – अभिनेता श्रेयश तळपदे यांचे खळबळजनक वक्तव्य

कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे मत – स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात भिन्न

श्रेयसने म्हटलं की, ती अत्यंत अनपेक्षित अशी वेळ होती. आपल्याला वाटतं की आपण सगळी काळजी घेत आहोत. व्यायाम, डाएट सगळ्या गोष्टी करतोय. पण तुम्हाला माहित नसतं कधी काय घडेल. त्यातच आता या सगळ्यावर कोविड लशीचा देखील संबंध असल्याचं आता म्हटलं जात आहे. आपण हल्ली असे अनेक किस्से ऐकतो, कि आता चांगला होता आणि अचानक असं काहीतरी झालं. मग या सगळ्याला काय कारण असू शकतं. मी औषधं घेत होतो. मला डाएबिटीज नाही, बीपी नाही मग दुसरं कारण काय असू शकतं.

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या निम्म्यावर ‘ह्युमन रिप्राॅडक्शन अपडेट’ जर्नलमध्ये धक्कादायक खुलासा
कोविड लस घेतल्यानंतर मला जास्त थकवा जाणवू लागला
तुला हृदयविकाराचा झटका आला? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रेयसने म्हटलं की, मी या थिअरली नक्कीच नाकारणार नाही. पण होय कोविडची लस घेतल्यानंतर मला जास्त थकवा जाणवू लागला होता. पण कदाचित मला लसीकरण किंवा कोविडमुळे हा त्रास झाला असले, हेही मी नाकारु शकत नाही. पण आता हे नक्की कशामुळे झालं, हे मलाही सांगता येणार आहे. मात्र यापैकी एका गोष्टीचा याच्याशी नक्कीच संबंध आहे.
शरीरावर नेमका काय परिणाम झालाय हे जाणून घ्यायचं
आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यामध्ये काय होतं, याची कल्पना आपल्या कोणालाच नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे. अर्थात आपण सगळ्यांनीच संबंधित कंपनीवर विश्वास ठेवला. त्यामुळे या सगळ्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम झालाय हे मलाही जाणून घ्यायचं आहे. पण माझ्या हार्टअटॅक मागे कोविडची लस कारणीभूत आहे, हे मी देखील ठामपणे सांगू शकत नाही, असं यावेळी श्रेयसने म्हटले.
अ‍ॅस्ट्राझेनेकाची न्यायालयात कबुली
अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या खुलाशानंतर कोरोनाची लस घेणाºया लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेकाने कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की, कोविशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. थ्रोम्बोसाइटोपेनियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात

कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे दोघांचा मृत्यू ?

कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास, त्यामुळे मी लस घेतली नाही – आमदार प्रणिती शिंदे यांचेकडून लस न घेतल्याची कबूली

फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा डीएनए – डीएनएमध्ये कर्करोग होण्याची क्षमता असल्याची शास्त्रज्ञांमध्येही चर्चा

 

Leave A Reply

Your email address will not be published.