मलेरियाच्या लसीला जागतिक ‘आरोग्य संघटनेची मान्यता – सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने केले संशोधन

0 82

मलेरियाच्या लसीला जागतिक ‘आरोग्य संघटनेची मान्यता

– सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने केले संशोधन

 

लंडन : मलेरिया प्रतिबंधक दुसऱ्या आरोग्य संघटनेने सोमवारी मान्यता दिली. या P आजारावरील पहिल्या लसीपेक्षा दुसरी लस किमतीने स्वस्त व अधिक ऑक्सफर्ड प्रभावी आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने मलेरियावरील नवी लस बनविली आहे. त्या लसीचे तीन डोस घ्यावे लागतील.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सांगितले की, दोन तज्ज्ञ गटांच्या शिफारसीनंतर आम्ही मलेरियावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिली आहे. मलेरिया होण्याचा धोका असलेल्या मुलांना ही लस देण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. ही नवी लस ७५ टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. ही लस व बूस्टर डोस घेतल्यानंतर सुमारे वर्षभर मलेरियापासून संरक्षण मिळू शकते. या लसीची किंमत १६६ ते ३३२ रुपये असण्याची शक्यता असून ती पुढील वर्षी काही देशांत उपलब्ध होईल.

अधिक प्रभावी लसींसाठी संशोधन आवश्यक

• जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया लस आरटीएस, एस/एएस०१ला मान्यता दिली होती.

• आता त्या आजारावरील दुसऱ्या `लसीला मान्यता दिली. मात्र, या लसींमुळे मलेरियांचा प्रसार पूर्णपणे थांबेल अशा भ्रमात कोणीही राहू नये…

• मलेरियावर अधिक प्रभावी लस बनविण्यासाठी यापुढे संशोधन सुरु ठेवावे लागणार आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.