मराठायोध्दे मनोज जरांगे पाटील यांची सभा अंबाजोगाई येथे हजारोंच्या उपस्थितीत पार पडली

0 137

मराठायोध्दे मनोज जरांगे पाटील यांची सभा अंबाजोगाई येथे हजारोंच्या उपस्थितीत पार पडली

 

अंबाजोगाई (धम्मपालसिंह कांबळे) : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मराठायोध्दे मनोज जरांगे पाटील यांचे अंबाजोगाई येथे उत्स्फूर्तपणे सकल मराठा समाजाने तसेच सर्व बहुजन समाजाने आदराने सन्मानाने आणि जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

जोपर्यंत मराठा समाजाला ५०% च्या आत आणि टिकणारे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा क्षत्रिय मराठ्याचा पठ्ठ्या शांत बसणार आणि कोणत्याही राजकीय अमिषाला बळी पडणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुणीही गटतट पाडू नका आणि जो गट पाडील त्याला समाजाने हात जोडून बाहेर काढायचे असेही याठिकाणी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
१४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी येथे राज्यस्तरीय मराठा महासभा होणार आहे.आणि त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उपोषणकर्त्यांच्या तसेच आंदोलकांच्या भेटीगाठी घेऊन महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त मराठा समाजाला करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.