आसाहबोद्दीन शेख सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

0 137

आसाहबोद्दीन शेख सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

✍🏻एम. ए. शेख
मुख्याध्यापक अ जि प पाटोदा म.

 

मा. असाहबोद्दीन शेख सरांनी त्यांच्या वयाचे ५८ वर्षे पूर्ण केल्याने सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या संपूर्ण काळामध्ये त्यांच्याकडून एक आदर्श शिक्षक कसा असावा हे जाणून समजून आणि उमजून घेण्यासारखे आहे. ते एक आदर्श शिक्षक तर आहेतच त्याशिवाय ते एक उत्तम साहित्यिक असून त्यांनी आपल्या साहित्यातून खावखेड्यातील व्यथांची मांडणी केली आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते इतरांच्या मदतीला तात्काळ धावून जातात हा त्यांच्या मनाचा खुप मोठा आहे.

रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड) कडून आसाहबोद्दीन शेख सरांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

एक विद्यार्थी प्रिय व समाज प्रिय शिक्षक कसा असावा हे असाहबोद्दीन सरांच्या कार्य आणि कर्तृत्वाकडे पाहील्यास सहज लक्षात येते. त्यांनी त्यांच्या वरीष्ठ कार्यालयाशी सलोख्याचे संबंध, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उठवणारे एक आदर्श शिक्षक व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक म्हणून यांची ख्याती राहिलेली आहे .
अशा गुणी व सर्वगुणसंपन्न शिक्षकाचा मला सहवास लाभला एक मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला.

ग्रामोन्नती परिवाराकडून आसाहबोद्दीन शेख सरांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

असाहबोद्दिन शेख सरांसारख्या अशा या बहुआयामी शिक्षकाचा मला सार्थ सार्थ अभिमान वाटतो. माझ्या ३८ वर्षाच्या सेवा काळामध्ये मी केवळ दोन-तीन शिक्षकांचा ऊल्लेख करीन ज्यात आसाहबोद्दीन शेख सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे शिक्षक आहेत. आपल्या सेवा काळामध्ये दैनंदिन अध्यापन करत असताना त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच कला, क्रीडा ,सांस्कृतिक कार्य व विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदवलेला आहे. दैनंदिन सेवा करत असताना त्यांनी दिल्ली आणि जयपूर या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करून त्या प्रशिक्षणाचा अनुभव आणि संपादन केलेल्या ज्ञान त्यांनी आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. अशा अष्टपैलू व हरहुन्नरी शिक्षकाला आज सेवापुर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. असाबोद्दीन शेख सरांचे भावी आयुष्य सुख-समृद्धी ,संपन्नता, शांती आणि निरोगी जावो .
उत्तर उत्तर त्यांची प्रगती होवो सगळ्या प्रकारचे सुख संपन्न आणि वैभवता लाभो अशी ईश्वर ,अल्लाच्या चरणी नम्र प्रार्थना करून त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.