शिक्षण क्षेत्राचा वसा स्वीकारलेले भूमिपुत्र शेख असाहबोद्दिन शेख दस्तगीर साहब

0 93

शिक्षण क्षेत्राचा वसा स्वीकारलेले भूमिपुत्र शेख असाहबोद्दिन शेख दस्तगीर साहब

 

✍🏻श्री.एम.पी.सोळंके
“नॅशनल डायरेक्टर” अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया.

ग्रामोन्नती परिवाराकडून शेख असाहबोद्दिन शेख दस्तगीर साहब सरांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

शिक्षण क्षेत्राचा वसा स्वीकारलेले भूमिपुत्र शेख असाहबोद्दिन शेख दस्तगीर साहब. ते मुळचे अंजनडोहकर ता.धारूर. जि.बीड. येथील असून मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केकानवाडी.केंद्र आडस.ता.केज. या ठिकाणी कार्यरत होते. त्यांनी आपल्या वयाचे ५८ वर्षे पूर्ण केले. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९६५ ला अंजनडोह येथे झाला. आपल्या सेवेचा आरंभ हा २८ नोव्हेंबर १९९५ ला गेवराई तालुक्यातील तरडगव्हान येथून झाला.आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कौशल्याचा,विविध सुप्त गुणांचा व सद्बुद्धीचा विद्यार्थी, पालक व समाजास निधर्म व निगर्वपणे सदुपयोग करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी निःस्वार्थीपणे केला ! त्यामुळे त्यांचे कर्तृत्व सिद्ध होते. विविध उपक्रमातून विद्यार्थांचे व्यक्तीमत्व फुलवण्याचे महान कार्य त्यांच्या कर्तृत्व काळात त्यांच्याकडून घडले. त्यामुळे त्यांचे नैपुण्य यातून सिद्ध होते. त्यांची विद्यार्थ्यांविषयीची तळमळ व धडपड विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्रबोधनांस व जडणघडणीस कारणीभूत ठरली !

 

उच्च विचार व समजूतदरपणा हा सद्गुण स्वयं व्यक्तीमत्व फुलावणारा ठरला. आपल्या वाणीने सामाजिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठीची तळमळ त्यातून सिद्ध होते. विविध क्षेत्रातील सहभाग हा सामजिक सलोख्याचे संबंध व ऋणानुबंध गुंफण्याचे कार्य आपल्या उदात्त अंतःकरणातून व सदकार्यातून घडले ! हीच आम्हां सर्वांना आनंद देणारी व अभिमानास्पद गोष्ट आहे. ते एक पत्रकार, साहित्यिक व कवी म्हणून विविध विषयांवर त्यांचे लिखाण पहावयास मिळते ! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून काव्य वाचनाची संधी ही त्यांच्या प्रतिभेची साक्षच ठरते ! विविध वर्तमान पत्रातून विविध विषयांवरील लेख सामाजिक समस्या व जाणिवांचा परामर्ष घेऊन जातात.त्यांनी आपल्या कारकीर्दीत २३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होऊन पात्र ठरले. व अन्य अनेक उत्तीर्ण झाले. पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देताना कांहीं कर्मचाऱ्यांना निलंबीत होत घरचा रस्ता धरावा लागला.चार लाख पस्तीस हजार रुपये समाज सहभाग जमा करून शाळेसाठी शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.यात डिजिटल शाळा,सौर पॅनल, हॅड वॉश स्टेशन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या.
केकानवाडी येथे वर्गखोलीस जागा नव्हती; ती त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सदरील रुमसाठी जागा उपलब्ध करून घेतली.

रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड) यांचेकडून असाहबोद्दिन शेख दस्तगीर साहब सरांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

जन्मभूमीतही त्यांचे योगदान मोठे आहे. संत गाडगे बाबा ग्राम स्वछत्ता अभियान यशस्वीतेमध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. सन २००४ ला गाव बक्षिसास पात्र ठरले होते.
आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे. विविध माध्यमातून यापुढेही आपले कार्य निरंतर चालू राहील;हीच यानिमित्त अपेक्षा व सदिच्छा ! आपणांस सेवानिवृत्तीच्या मनःपुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! आपले यापुढील आयुष्य व भविष्य निरोगी, उज्ज्वल व आनंदी जावो ! हीच यानिमित्त सदिच्छा व शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.