वंचित बहुजन आघाडी, शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन कडून खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा

0 132

वंचित बहुजन आघाडी, शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन कडून खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा

 

अंबाजोगाई (धम्मपालसिंह कांबळे ) : खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी,शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन कडून अंबाजोगाई येथे मोर्चा काढण्यात आला.यावेळी असंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, जिल्हा प्रभारी अमोल लांडगे सम्यक विद्यार्थी आंदोलन चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बोराडे,पारलिंगी समाज नेत्या नंदिनी ताई, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेचे सरसेनापती धम्मपालसिंहराजे कांबळे,शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सम्राट हिरवे,शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेचे सरसल्लागार गौरव करपे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे ब्रिजेश इंगळे, वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष गोविंद मस्के,शहर महासचिव नितीन सरवदे तसेच असंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोर्चासाठी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.