मधुमेहासारख्या रोगांवर ‘उलटी लस’ सक्षम नवीन अभ्यासातील निष्कर्ष

0 110

मधुमेहासारख्या रोगांवर ‘उलटी लस’ सक्षम नवीन अभ्यासातील निष्कर्ष

 

शिकागो : एका नवीन अभ्यासात प्रो. ‘जेफ्री हबेल आणि सहकारी संशोधकांनी एका नवीन उलटी -लसी’ची चर्चा केली आहे, जी प्रयोगशाळेत एखाद्या व्यक्तीच्या निरोगी पेशींवर हल्ला करणाऱ्या स्वयंप्रतिकार प्रतिक्रिया थांबवू शकते, जसे की बहुविध स्क्लेरोसिस (धमण्या आकसणे), मधुमेह टाईप १ प्रकिंवा संधिवात रोग.

शिकागो विद्यापीठाच्या प्रित्झकर स्कूिल ऑफ मॉलिक्युलर इंजिनीअरिंगमधील (पीएमई) संशोधकांनी विकसित केलेल्या नवीन प्रकारच्या लसीने प्रयोगशाळेत ही बाब सिद्ध केली आहे.

एक सामान्य लस मानवी रोगप्रतिकारक प्रणालीला जीवाणूविषाणूंना शत्रू म्हणून ओळखण्यास शिकवते. त्यामुळे ही रोगप्रतिकारक शक्ती (पांढऱ्या पेशी) त्यावर हल्ला करतात. नवीन ‘उलटी लस’ नावाप्रमाणेच उलटे काम करते. ती एका रेणूची रोगप्रतिकारक प्रणालीची स्मृती काढून टाकते. संसर्गजन्य रोगांसाठी अशी रोगप्रतिकारक स्मृती पुसून टाकणे धोक्याचे असले तरी, ते स्क्लेरोसिस, टाइप १ मधुमेह किंवा संधिवात यासारख्या रोगांमध्ये फायदेशीर ठरू शकते.

नेचर बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये वर्णन केलेली ‘इनव्हर्स व्हॅक्सिन’ यकृत नैसर्गिक प्रक्रियांमुळे मरणाऱ्या पेशींवरील स्वयंप्रतिकार हल्ला टाळण्यासाठी रेणूंना ‘हल्ला करू नका’ असा आदेश देण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे चालते. पीएमई संशोधकांनी उलटी लस वापरून स्क्लेरोसिससारख्या रोगाशी संबंधित स्वयंप्रतिकार प्रतिक्रिया कशी थांबवू शकते हे दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.