मराठ्यालाच नव्हे तर कोणताच जातीला ‘जातीय आधारावर आरक्षण देऊ नये : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती – ब्राम्हण मुख्यमंत्री ‘टार्गेट’ ! मराठा आंदोलन म्हणजे मतांचे राजकारण

0 1,567

मराठ्यालाच नव्हे तर कोणताच जातीला ‘जातीय आधारावर आरक्षण देऊ नये : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

– ब्राम्हण मुख्यमंत्री ‘टार्गेट’ ! मराठा आंदोलन म्हणजे मतांचे राजकारण

 

मुंबई : मराठ्यांना आरक्षणाची काही एक गरज नसून मराठ्यालाच नव्हे तर कोणताच जातीला ‘जातीय आधारावर आरक्षण देऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राम्हण आहेत म्हणून मराठा समाजाने त्यांना ‘टार्गेट’ करणे अत्यंत चुकीचे आहे असे पुरीचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

कोणताच जातीचा ‘जातीय आधारावर आरक्षण देऊ नये

मराठा आरक्षणाला जोरदार विरोध करीत शंकराचार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार समर्थन केले आहे. गुरुवारी शंकराचार्यांनी एका दीया दरम्यान आपले मत व्यक्त केले. केवळ मराठ्यालाच नव्हे तर कोणताच जातीचा ‘जातीय आधारावर आरक्षण देऊ नये असे जाहीर मत व्यक्त करतानाच या जातीय आरक्षणाने देशाचा सत्यानाश केल्याचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

आरक्षण संपुष्टात येत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही

कोणत्याही समुहाला जातीवरून आरक्षण देणे म्हणते त्या समुहाला कमजोर करणे असून जोपर्यंत जातीनिहाय आरक्षण संपुष्टात येत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही असेही शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. देशातील जातीय आरक्षणासारख्या गंभीर संवेदनशील मुद्याला संपविण्यावर आता लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचेही शंकराचार्यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण ही अत्यंत चुकीची मागणी

मराठ्यांची आरक्षणाची मागणी केवळ आणि केवळ मतांचे राजकारण असून हरियाणात जाट, राजस्थानात गुर्जर, गुजरातमध्ये पटेल आणि आता महाराष्ट्रात मराठा जातीचा आधार घेत आरक्षण मागत आहेत, ही अत्यंत चुकीची मागणी असून जातीय आरक्षणाच्या मागणीमुळे या राज्यामध्ये अशांतीचे वातावरण तयार होत आहे असा आरोप करीत शंकराचार्यांनी या आरक्षणास तीव्र विरोध दर्शविता आहे. सर्व जाती एकमेकांविरूध्द लढत असून वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करीत जाती आधारित आरक्षण संपुष्टात आणावे अशी मागणी शंकराचार्यांनी केली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू सुध्दा जात आधारित आरक्षणाच्या विरोधात होते असा दाखलाही शंकराचार्यांनी आपल्या निवेदनाला समर्थन देताना दिला आहे. शंकराचार्याच्या या विरोधामुळे मराठा समाजात मात्र चांगलीच खळ माजली आहे.

पाठ्यपुस्तकात रामायण व महाभारताचा समावेश करावा

मदरसांमध्ये कुराण आणि ख्रिश्चन शाळांमध्ये जर बाययत शिकविण्यास या देशात बंदी नाही, मग शाळांमध्ये रामायण, महाभारत का शिकविण्यात येत नाही ? असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला असून पाठ्यपुस्तकात रामायण व महाभारताचा समावेश करावा अशी मागणीही शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे.

शंकराचार्याच्या मराठा विरोधामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असे सांगणारे हे शंकराचार्य कोण ? असा सवाल मराठा समाजात उमटत असून शंकराचार्यानी अस्तित्वात असलेले सर्वच जातीत आरक्षण रद्द करा अशी मागणी केल्याने सर्वच आरक्षित जातीजमातीमध्येही संताप व्यक्त होत आहे. मराठ्यांना आरक्षण नाकारण्यासाठी शंकराचार्याच्यामार्फत सरकार तर वातावरण निर्मिती करीत नाही ना? अशीही एक प्रतिक्रिया उमटली

आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.