परळी-सिरसाळा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ रस्त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबून चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

0 47

परळी-सिरसाळा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ रस्त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबून चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

संबंधित प्रशासनातील अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर बोगस कामाची चौकशी करून कारवाई करा : तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

परळी (वार्ताहर) : बीड जिल्ह्यातील परळी- ते सिरसाळा या राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ या रस्त्याचे काम चालू आहे हे काम मोठ्या प्रमाणात बोगस होत असून हे काम दर्जेदार करण्यात यावे तसेच या कामामध्ये मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील दगड गोट्याचा वापर केला असुन हे काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी सिरसाळा हे २२ किलोमीटरचे काम यश कंट्रक्शन ही कंपनी करत आहे हे काम करत असताना मोठ्या प्रमाणात कामांमध्ये अनियमितता असून काम अत्यंत बोगस व निष्कृष्ट दर्जाचे होत आहे हे काम तात्काळ थांबून झालेल्या कामाची गुणवत्ता तपासणी करावी तसेच सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या व खडी टाकण्याचे काम सुरू आहे सदरील काम अत्यंत बोगस होत आहे व मागच्या काही महिन्यापासून अत्यंत संत गतीने हे काम चालू आहे याचा वाहनधारकांना व त्या रस्त्यालगत असलेल्या गावातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या मुरुमावर दिवसातून कमीत कमी चार वेळा तरी पाणी मारणे अपेक्षित असताना एखाद्या वेळी पाणी मारलं जात आहे त्यामुळे धुळीची मोठ्या प्रमाणात समास्या निर्माण झाली असून मोटरसायकल वरुन प्रवास करणाऱ्या लोकांना तर खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे हे काम तात्काळ थांबवून योग्य ती कारवाई करावी.हे काम उच्च दर्जाचे व उत्कृष्ट व्हावे अन्यथा या बोगस कामाच्या,गुत्तेदाराच्या, प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने त्या रस्त्यालगतच्या गावातील लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.