अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून ?

बामसेफ सारख्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या कार्यक्रमांना ही भटी व्यवस्था निर्बंध घालत असेल तर इतर छोट्या छोट्या संघटनांचे काय ? त्यामुळे यातून या गटा गटात विभागलेल्या संघटनांनी काहीतरी बोध घेऊन आता कुठेतरी एकमेकांना जवळ येण्याची वेळ आली आहे अन्यथा सर्वांच्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून ? डोळ्यादेखत होताना गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही.

0 275
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून ?

 

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

 

भारत मुक्ती मोर्चाने नागपुरात आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केल्यापासून रामदासी स्वयंसेवक संघाचा लंगोट पिवळा झाल्याचे प्रसारमाध्यमातून दिसत होते. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांच्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये परशुराम भक्त जळफळाट करत आहेत म्हणजेच मा. वामन मेश्राम यांनी मारलेला निशाणा योग्य असून तो ब्राम्हणवाद्यांच्या योग्य ठिकाणी ठणका देत आहे अस म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. जर बामसेफ सारख्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या कार्यक्रमांना ही भटी व्यवस्था निर्बंध घालत असेल तर इतर छोट्या छोट्या संघटनांचे काय ? त्यामुळे यातून या गटा गटात विभागलेल्या संघटनांनी काहीतरी बोध घेऊन आता कुठेतरी एकमेकांना जवळ येण्याची वेळ आली आहे अन्यथा सर्वांच्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून ? डोळ्यादेखत होताना गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही.
भारत मुक्ती मोर्चाने आरएसएस मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय का घेतला यामागे काही कारणे आहेत ती अशी की, २७ जून २०२२ रोजी हरियाणा राज्यातील रोहतक येथे डीएनए परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा त्या परिषेदेला विरोध करण्यासाठी आरएसएस व भाजपधील ब्राम्हण निरज कुमार वत्स आणि जय हिंद नवीन यांनी हाती कु-हाड घेऊन धमकी देण्याचा प्रयत्न केला. रोहतक येथिल एमपी अरविंद शर्मा (भाजपा) च्या माध्यमातून या कार्यक्रमाला विरोध केला त्यामुळे प्रश्न पडतो की, डीएनए परिषदेची ब्राम्हणांना येवढी भिती का ? डीएनए वर ते चर्चा का करू देत नाहीत ? हरियाणा सरकार व रोहतक प्रशासन संविधानिक मुल्ये नाकारत आहे म्हणून संविधानिक मुल्यांच्या समर्थनार्थ भारत मुक्ती मोर्चाने आरएसएस मुख्यालयावर लाखो लोकांचा मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय दिल्ली येथिल आपल्या कार्यक्रमात जाहीर केला होता. (भारत मुक्ती मोर्चाचे पत्रक) डीएनए परिषदेला तेच विरोध करत आहेत ज्यांना संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही. हातात कु-हाड घेऊन धाक दाखवणारे ब्राम्हण कोरेगाव भिमाचा रणसंग्राम विसरले का ? ब्राम्हणांच्या हाती केवळ आपली भिक्षुकी करण्यासाठी खोटी काल्पनिक शास्त्रे शोभतात पण ते जर शस्त्राची भाषा करत असतील तर ह्या नपुंसकांना शस्त्रे पेलतील का ? कारण ‘ब्राम्हणांनो शस्त्रे हाती घ्या !’ या पुस्तकात संभाजी ब्रिगेडचे संघटक डाॅ. बालाजी जाधव यांनी ब्राम्हण कसे नपुंसक आहेत, त्यांच्या हाताला कशी शस्त्रे पेलणार नाहीत याचा उलगडा केला आहे. म्हणून शस्त्रांचा धाक दाखवून आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणा-या भटी बाटग्यांना सांगावं वाटतं की, शस्त्रे केवळ शुरांच्या हाती शोभतात. त्यामुळेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की, शुरा साजती हाथियारे गांड्या हासतील पोरे !.
२१ आॅगस्ट २०२२ रोजी कानपूर येथे बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी संघाचे ३७ वे उत्तर प्रदेश मध्ये राज्य अधिवेशन होते.  या कार्यक्रमाला आरएसएस व भाजपच्या लोकांनी विरोध केला त्यात दुर्गेश मणि त्रिपाटी या ब्राम्हणाने विरोध केला. हा जनतेच्या मैलिका अधिकारावर घातलेला गदा होता अशा प्रकारे आरएसएस व भाजपकडून संविधानाचा अवमान केला जात आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणार्थ आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय भारत मुक्ती मोर्चाने घेतला.(भारत मुक्ती मोर्चाचे पत्रक) विदेशी ब्राम्हण स्वदेशी लोकांना शस्त्रे हाती घेऊन काय म्हणून घाबरवत आहेत ? लोकांच्या माथे-यावर जगणारे हे साडेतीन टक्के विषारी आणि विदेशी ब्राम्हण जर आम्हा बहुजनांच्या तोंडाला लगाम लावत असतील तर आम्ही का म्हणून शांत बसले पाहीजे. आज जर आमच्या बोलण्यावर ब्राम्हणांनी बंदी घातली तर उद्या ते आमच्या कृतीवर देखिल बंदी घालू शकतात त्यामुळे बहुजन समाजातील सर्व पुरोगामी संघटनांनी भारत मुक्ती मोर्चाच्या या कार्याला पाठिंबा दिला पाहीजे पण आमच्या संघटना गटा गटात विभागल्यामुळे आपण नेतृत्वहीन होतो की काय ही भिती सतावत असल्यामुळे चिडीचूप शांत दिसत आहेत ही खुप मोठी शोकांतिका आहे.
आदिवासी हिंदू नाहीत परंतु आरएसएस त्यांना हिंदू म्हणते. एका आदिवासी महीलेला राष्ट्रपती या पदावर बसवून तीला वैदिक मंत्रोच्चाराने शुध्द करण्याचा प्रकार म्हणजे ब्राम्हणी मस्तकातून निघालेली घाण आहे. कारण स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात की, हिंदू ही एक मुगल शासकांनी दिलेली शिवी असून त्याचा अर्थ दुष्ट, नीच, कपटी, गुलाम असा आहे. (सत्यार्थ प्रकाश पृ. ८१) या शिवीचा उपयोग करून आरएसएस येथिल मुलनिवासी लोकांना गुलाम, दुष्ट व निच ठरवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. (भारत मुक्ती मोर्चाचे पत्रक) आज ब्राम्हण व आदिवासी जर हिंदू असतील आणि येणा-या काळात देश हिंदूराष्ट्र असेल मग राष्ट्रपती पदावर बसलेल्या महीलेवर काय म्हणून गोमुत्राचा वर्षाव करावा लागत आहे ? म्हणजेच आदीवासी हिंदू नाहीत हे स्पष्ट होत. दयानंद सरस्वतीच्या मतानूसार जर हिंदू ही शिवी असेल तर मग आम्ही काय म्हणून आम्ही गर्व से कहो हम बुद्धू है ? म्हणाव. त्यामुळे विदेशी ब्राम्हणांची फौज आरएसएसच्या मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चा लाखोंचा जनसमुदाय घेऊन जाणार होता तर यात काय चुकीचे होते ? आदीवासी खरेच हिंदू आहेत का ? हे पाहण्यासाठी या लिंकचा उपयोग करा. https://youtu.be/_8FLFIUKXF8
१९३१ पर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना दरवेळी नियमितपणे होत होती. त्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यास जनगणना करणे बंद करून काॅग्रेस भाजपने ओबीसी प्रवर्गातील लोकांना धोका दिला. हे सर्व कारनामे मोहन भागवताच्या म्हणण्यानुसार होत आहेत म्हणून आरएसएस मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (भारत मुक्ती मोर्चाचे पत्रक) देशात ज्या संघप्रणित भाजपचे सरकार आहे तिथे गाढव, घोडे, सिंह व पाळीव प्राण्याची संख्या मोजली जाते मात्र ओबीसींची जातीनिहाय जनगणना होत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. देशातील भाजपचे सरकार आरएसएसच्या मोहन भागवतच्या मतानूसार निर्णय घेते येथे लोकांच्या मतांचा विचार केला जात नाही म्हणून भारत मुक्ती मोर्चाने जर आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला ही कौतुकाची गोष्ट आहे. ओबीसींची जनगणना झालीच पाहीजे याविषयी वामन मेश्राम यांचे काय मत आहे हे  https://youtu.be/seFR3i0iozk या लिंकवर पाहता येते.
राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील सायला भागातील सुराना गावातील इयत्ता तिसरी मधील इंद्रकुमार मेघवाल वय वर्ष ९ यांची हत्या केली होती, कारण त्याने शाळेमधील माठातील पाणी पिले होते. जातीव्यवस्थेच्या घाणीतून त्या मुलाची हत्या झाली कारण जातीव्यवस्था घट्ट करण्याचे काम आरएसएस व ब्राम्हण करत असल्यामुळे त्याविरोधात आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (भारत मुक्ती मोर्चाचे पत्रक) आजही जर आम्हाला पाणी पिण्यापासून रोखल्या जात असेल तर कुठे आहेत आमचे हक्क आणि अधिकार ? निरागस बालकांची जर जातीय मानसिकतेतून हत्या घडवून आणली जात असेल तर जातीयवादाला खतपाणी घालणा-या आरएसएसचे मुख्यालय पेटवून का देऊ नये ? इंद्रकुमार मेघवाल या मुलासोबत नेमकं काय झालं हे बघण्यासाठी https://youtu.be/psF80UqsvyQ या लिंकचा उपयोग करा. तेव्हा तुम्हाला कळेल की, बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाने घेतलेली भुमिका योग्य आहे. कारण जातीयवादी मानसिकता निर्माण करणा-या मुळावरच घाव घातला पाहीजे अन्यथा फांद्या छाटून काय उपयोग होणार आहे ?
मद्रास हायकोर्टाने मुनियप्पन स्वामी ची मुर्ती ही बुद्धांची मुर्ती असा महत्वपूर्ण निर्णय दिला. कारण देशातील सर्व पुरातन मंदिरात बुद्ध मुर्ती व त्यांचे अवशेष आहेत. ब्राम्हणांनी या मंदीरावर कब्जा केलेला आहे. त्यामुळे ती ठिकाणे काढून घेण्यासाठी आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (बहुजन क्रांती मोर्चाचे पत्रक) मद्रास हायकोर्टाने दिलेल्या या महत्वपुर्ण निर्णयाची बातमी येथे https://youtu.be/GD4Kdt5OrhU जाऊन बघा. हा कोर्टाचा निर्णय आता आला. पण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात आजची सर्व मंदीरे ही पुर्वीची बौद्ध स्तुप आहेत असं ठणकावून सांगितले होते. तसेच के. जमनादास यांनी ‘तिरुपती एक प्राचीन बौद्धक्षेत्र’ या पुस्तकात अनेक संदर्भ देऊन मंदीरे हीच बुद्ध स्तुप आहेत असं सांगितलं आहे. त्यामुळे ब्राम्हणवाद्यांचे बालेकिल्ले असलेली मंदीरे जर आमची असतील तर भारत मुक्ती मोर्चाने घेतलेली भूमिका कुठे चुकीचे आहे. कारण पुरी जगन्नाथ येथे मंदीर नसून बुद्ध स्तुप आहे ते कसे हे https://youtu.be/tAMHoRTY1oc या लिंकवरचा व्हिडिओ बघितल्यास लक्षात येते.
माजी पोलिस महासंचालक एस.एम. मुश्रिफ यांनी त्यांच्या ‘बाॅम्बस्फोट : ब्राम्हणवादी दोषी, मुस्लिमांना फाशी’ या पुस्तकात लिहले आहे की, आरएसएस हे एक आतंकवादी संघटन असल्यामुळे लोकशाहीला धोका आहे. कारण अजमेर शरीफ बाॅम्बस्फोट प्रकरणात आरएसएसच्या लोकांना आजीवन करावासाची सजा झाली आहे. देशात अनेक ठिकाणी आरएसएसने बाॅम्बस्फोट घडवले आहेत. मालेगाव प्रकरणात २०१४ ला भाजपा सत्तेत आल्यास कर्नल पुरोहितला जमानत भेटली होती.  त्यामुळे आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (भारत मुक्ती मोर्चाचे पत्रक) हो हे एकदम सत्य आणि वास्तव आहे कारण एस.एम. मुश्रिफ यांनी ‘हु किल्ड करकरे’ या पुस्तकात आरएसएसचे काळे कारनामे व्यवस्थित मांडले असून ते या https://youtu.be/wMtg6RiHp_Q लिंकवर जाऊन बघताही येतील या भाषणातून त्यांनी ह्या रामदासी स्वयंसेवक संघाचा असली चेहरा त्यांनी मांडला आहे. त्यामुळे भारत मुक्ती मोर्चाने घेतलेली भुमिका योग्य वाटते. कालच्या नागपुर येथिल आंदोलनाचे समर्थन एस.एम. मुश्रिफ यांनी करताना नेमके काय म्हटले हे https://youtu.be/8LeSTXIPeB0 येथे जाऊन पाहू शकता.
त्यामुळे शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, विदेशी ब्राम्हणांच्या हिंदुराष्ट्रात आपलं स्थान कुठे असेल ? कारण आज संविधान व लोकशाही असताना जर तुमचा आवाज दाबला जात असेल तर हिंदुराष्ट्रात तुमची जीभ का कापली जाऊ शकणार नाही ? त्यामुळे वेळीच सावध होऊन आपण नेमकं कशाचे समर्थन करत आहोत याचा एकदा शांत डोक्याने विचार करा. कारण डोक्याने केलेला विचार हा कधीच चुकीचा होत नाही. आणि डोकं असणारा कधीच भांडवलशाही व ब्राम्हणशाहीच समर्थन करू शकत नाही. त्यामुळे आपल्या धडावर आपलंच मस्तक आहे का ? कारण धड तुमचं आणि मस्तक ब्राम्हणवांद्याच झाल्यास तुमची वाट देशातील ब्राम्हण लावून तुमच्या तोंडाला मडक आणि गांडीला झाडू बांधून फिरायला लावतील हे कोणीही नाकारू शकणार नाही. गाडगे आणि झाडू हिंदूराष्ट्रात तुमची वाट बघत आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..!

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील 

१. भट बोकड मोठा

२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क- रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२

Leave A Reply

Your email address will not be published.