गळ्यात ईष्टलिंग असताना दगड धोंड्यापुढे मेंदू गहाण ठेवायचा ?

0 294

गळ्यात ईष्टलिंग असताना दगड धोंड्यापुढे मेंदू गहाण ठेवायचा ?

 

महादेव राजमाने

 

मला माहीत आहे लोकांच्या टीकेचा मी शिकार होऊ शकतो .. पण स्वत:चा मेंदु किती दिवस गळ्यात ईष्टलिंग असुन देखील दगड धोंड्यापुढे आपला मेंदू गहाण ठेवायचा. महामानव बसवण्णांनी मंदीरातला देव नाकारुन आम्हाला ईष्टलिंग दिला त्या वेळची परिस्थिती तसी होती. स्त्री मंदीरात जाऊ शकत नव्हती नव-या किंवा माहेरच्या माणसांचा विरोध होता असा कोणताच भाग नव्हता तर स्त्रीच्या स्पर्शाने देव बाटत होता. म्हणून बसवण्णांनी मंदीरातला देव नाकारून देवच सगळ्याच्या दिला आणि वचनांच्या माध्यमातून नंतर त्या मंदिरातल्या देवा कडे वळणार नाहीत यासाठी काही वचने निर्माण केली.
महामानव बसवण्णाचे क्रांतिकारी विचार

दिसेल त्याला पति म्हणणाऱ्याला कुलटेला पतिव्रता सज्जन कसे म्हणता येईल ? (त्याप्रमाणेच) लिंग प्रसाद सेवन करून अन्यदेवांची स्तुती करणारे दांभिक आहेत. ढोंगी आहेत… बरं हे आज का ? सांगतोय किंवा पोष्ट दिसतोय, कारण तेवढंच आहे की आज २०२३ चालू आहे संविधान ही लागू आहे. पण आजही परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. ज्या वेळी मंदिरात गेलो त्या वेळी बाहेर एक कुत्रा देव चाटत होता. असो, तो कुत्र्याचा कदाचीत अधिकार असू शकतो आपलं काहीच म्हणण नव्हत, त्याने त्याच काम करावं शुभेच्छा ! त्याला पण ज्या वेळी माझी आई आणि असंख्य माता बहिणी ज्या वेळी दर्शन करताना देवाला स्पर्श नकळत होत होता त्या वेळी तेथील ब्राम्हण माता बहिणीनां देवाला स्पर्श करून नका देवाला लागु नका एक दोन वेळा नाहीतर वारंवार म्हणत होता म्हणजे आजही स्त्री स्पर्शाने देव बाटतो, चिड येत होती पण काही इलाज नव्हता म्हणून शांत बसावं लागलं.

कुत्र्याच्या चाटल्याने देव बाटत नाही ?

मंदीरात ज्यावेळी महिला मुर्तीला हात लावत होत्या त्या वेळी मंदिरातील भट पुरोहीत मुर्तीला हात लावू नका देव बाटेल असं वारंवार सांगत होता. मग प्रश्न पडतो की, कुत्र्याच्या चाटल्याने देव बाटत नाही मग स्त्रीच्या स्पर्शाने बाटतो तरी कसा ? म्हणजे ब्राम्हणी धर्म शास्त्रानुसार स्त्रीला आजही कुत्र्याच्या पलीकडचे स्थान आहे हेच सिद्ध होते. म्हणूनच बसवण्णानी दगडाचा देवच नाही तर ब्राम्हणानी बनवलेलं शास्त्र पण नाकारले. आज आई बहीणींना गरज आहे ती बसवण्णा समजून घेण्याची, आमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची.. तुमच्या आमच्यावर एक जबाबदारी आहे .
आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची स्वतंत्र धर्म निर्माण करण्याची ची जो वैदिक ब्राह्मणाच्या दावणी ला बांधला गेलाय … असो शेवटी भावना दुखावल्या गेल्या असतील तर नक्की operation करा … अभिमान मला माझ्या वर मी लिंगायत माझा धर्म लिंगायत.

Leave A Reply

Your email address will not be published.