मराठ्यांची भीती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसते – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अजित पवार यांचेसह जय पवार यांना टोला

0 15

मराठ्यांची भीती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसते
– मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अजित पवार यांचेसह जय पवार यांना टोला

बीड : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र मराठा समाजाची तोफ असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून निवडणुकीमध्ये मराठ्यांची भीती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसते, असे म्हणत त्यांनी मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न होत असून माझ्या कुटुंबावरती हल्ला करण्याचा डाव रचला जातोय, असे सांगितले. ते जालना येथून बोलत होते.

मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात असून त्यांनी मुक्कामासाठी सात आठ गोधड्या आणल्या आहेत – भाजपच्या नेत्यांमुळे मोदींवर वाईट वेळ मनोज जरांगे पाटलांकडून मोदी भाजपची धुलाई

भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाला खोडा घातला – पंतप्रधान मोदींवर इतकी वाईट वेळ, स्वत:चे चिन्ह सोडून दुसºयाच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ मनोज जरांगेंचा भाजपला टोला

यावेळी जरांगे म्हणाले की, सरकारला माझी निष्ठा विकत घेता येत नाही, म्हणून असा डाव चाललाय, अशी मला खबर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भावनिक करुन मला मागे सरकवण्याचा काम होत आहे. माझ्या बलिदानाने गृहमंत्र्यांचे समाधान होत असेल तर मी बलिदान द्यायला आणि जेलमध्ये जायला देखील तयार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जरागेंनी हल्लाबोल केला. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची निवडणुकीमध्ये भीती आहे, ती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसतं, असे म्हणत मनोज जरांगे यांनी जय पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं. कारण बारामतीमधील निवडणुकांपूर्वीच जय पवार यांनी अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मोदींना मराठा आरक्षण द्वेषाची डनगाळी! मराठा धनगर आरक्षणाला मोदींच्या अप्रत्यक्ष विरोधामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी लाट

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार – मनोज जरांगे यांचा सर्व राजकीय पक्षांना इशारा
मराठ्यांचा विरोध किंवा ओबीसी मराठा वाद असता तर मुंडे साहेबांना एवढ्या मतांनी निवडून दिलेच नसतं. त्यांच्या मुलीला दोनदा खासदार आणि पुतण्याला आमदार केलं नसतं. तसेच त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडेंना आणि केशर काकू क्षीरसागर यांना आमदार केलं नसतं, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास सांगत मुंडे कुटुंबीयांना पिढ्यानपिढ्या निवडून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंडे बहीण भावाला मराठ्यांनी मोठे केलं. मात्र, एवढं करून मराठा ओबीसी वाद असल्याचे बोलत आहेत, एका क्लिपवर तुम्हीच बोललात. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आम्ही विरोधक कधीच मानलं नाही, मराठ्यांचा विरोध असल्याचं काही कारण नाही. बजरंग सोनवणे किंवा पंकजा मुंडे दोन्हीपैकी कोणालाही मतदान केल तरी ओबीसीचाच उमेदवार निवडून येणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली.

बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र – पंतप्रधान मोदींच्या मराठा आरक्षण विरोधी वक्तव्याने पंकजा मुंडेच्या टेन्शनमध्ये वाढ

नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही – हा त्यांचा बालिशपणा म्हणत छगन भुजबळांचे नाव ने घेता पंकजा मुंडेचा टोला
मराठा समाज जातीवादी असता तर……
मराठा समाज जातीवादी असतात तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले नसते, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले नसते, सुशीलकुमार शिंदे, नाईकसाहेब मुख्यमंत्री झाले नसते, देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री झाले नसते. पण, मराठ्यांनी गादीवर बसवलं, त्याच मराठ्यांच्या लेकरांवर तुम्ही एसआयटी लावू लागला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू लागलात, असे म्हणत मनोज जरांगेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्याला पाडायचे त्याला पाडा
मी महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा अपक्षा बरोबर नाही, मराठ्यांनी ज्याला पाडायचे त्याला पाडा. मात्र, त्याच्या पाच पिडया पुन्हा उभ्या राहिल्या नाही पाहिजे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

बीडमधून रविकांत राठोड यांनी केली समनक जनता पार्टीशी गद्दारी – अखेरच्या दिवशी गुपचूपपणे नामांकन मागे घेतल्याने पक्षातुन हकालपट्टी

परळी बिहारमध्ये नाही तर महाराष्ट्रात येते – बजरंग सोनवणे यांचा मुंडे बहीण भावाला टोला

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.