बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र – पंतप्रधान मोदींच्या मराठा आरक्षण विरोधी वक्तव्याने पंकजा मुंडेच्या टेन्शनमध्ये वाढ

0 259

बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र
– पंतप्रधान मोदींच्या मराठा आरक्षण विरोधी वक्तव्याने पंकजा मुंडेच्या टेन्शनमध्ये वाढ

बीड : बीड लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर राज्यामध्ये एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशी निवडणूक होत आहे, मात्र बीड याला अपवाद आहे. कारण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपरिक लढत सुरू असताना नरेंद्र मोदींनी मी जिवंत असेपर्यंत दलित, आदिवासी, ओबीसी आणि वंचितांचे आरक्षण कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याने पंकजा मुंडेच्या टेन्शनमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात

मोदींना मराठा आरक्षण द्वेषाची डनगाळी! मराठा धनगर आरक्षणाला मोदींच्या अप्रत्यक्ष विरोधामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी लाट

झरीकरांनी घेतला हार्ट अटॅकचा धसका – उपाययोजना करण्याची वैद्यकीय अधिकाºयांकडे मागणी
बीड जिल्ह्यामध्ये जशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तसा प्रचाराचा जोरदेखील आता वाढू लागला आहे. मात्र बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीचा मुद्दाच पुढे येताना पाहायला मिळतोय. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सुरू असतानाच मोदींनी आंबाजोगाई येथील जाहीर सभेत अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाला विरोध केल्याने हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या निवडणूकीत कोणत्याही नेत्यांने मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य केले नव्हते. मात्र या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजात भाजपविरोधात संतापाची लाट पसरल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवारदीने नेते धनंजय मुंडे यांचेकडून आमची जात का काढली जात असल्याचा सवाल उपस्थित करून सारवासारव करण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

लसीकरणानंतर जर्मनीमध्ये जन्मदरात मोठी घट – कोविड लसीकरणानंतर ९ महिन्यात आलेला रिपोर्ट

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली
यापूर्वी बीड लोकसभा मतदार संघात ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे व त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना दोनवेळा संधी दिली. मात्र या निवडणूकीत भाजप नेते जाणीवपूर्वक मराठा आरक्षण विरोधात वक्तव्य करीत असल्याने मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मात्र मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर चुकीचे वक्तव्य करणाºया पंकजा मुंडे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बघून मन कलुषित होतं, असल्याचे सांगत सारवासारव करीत असल्याचे दिसत आहेत.
महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार बीड जिल्ह्यात जातीचा मुद्दा उकरून काढला जात असल्याचे बोलले जात आहे. यात धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत जात आल्याचे म्हटल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना प्रतिउत्तर देताना या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी कोणतीही जात हा मुद्दा नाही तर आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत. उलट धनंजय मुंडेच निवडणुकीत जात फॅक्टर चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा डीएनए – डीएनएमध्ये कर्करोग होण्याची क्षमता असल्याची शास्त्रज्ञांमध्येही चर्चा

मलेरियाच्या लसीला जागतिक ‘आरोग्य संघटनेची मान्यता – सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने केले संशोधन

Leave A Reply

Your email address will not be published.