आधुनिक मनुस्मृती असलेल्या ईव्हीएमवर पेट्रोल टाकून फेटविण्याचा प्रयत्न – मतदानासाठी वापरण्यात येणा-या ईव्हीएम मशीन बोगस असल्याचा तरूणाचा आरोप

0 449

आधुनिक मनुस्मृती असलेल्या ईव्हीएमवर पेट्रोल टाकून फेटविण्याचा प्रयत्न
– मतदानासाठी वापरण्यात येणा-या ईव्हीएम मशीन बोगस असल्याचा तरूणाचा आरोप

सांगोला : लोकसभा निवडणूकीतील तिस-या टप्प्यातील मतदान सोलापूर व माढा लोकसभेसाठी मतदार संघात मंगळवारी सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र उन्हाळा झळा वाढत असल्याने मतदारांनी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. यावेळी बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार झाल्याचा संशय आल्याने बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्या मतदान यंत्राला आधुनिक मनुस्मृती असे संबोधतात त्या आधुनिक मनस्मृती म्हणजे इव्हीएमवर पेट्रोल टाकून तिची होळी करण्याचा प्रयत्न एका मतदारने केला. यावेळी या तरूणाने एक मराठा लाख मराठा घोषणा देत या मशिन बोगस असल्याचा आरोप केला. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

ईव्हीएम हटाव, दांडपट्ट्याने ईव्हीएम मशिनची प्रतिकृती फोडत भारतीय बेरोजगार मोर्चाकडून सरकारचा निषेध

ईव्हीएम… गिरीश कुबेर यांच्याकडून बालीश प्रश्‍नांची नौटंकी…आणि उद्धव ठाकरे…!

टाकळी येथील बुथवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड – १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलल्यानंतर मतदान सुरूळीत
सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे आधुनिक मनुस्मृती ईव्हीएमचे थोडेसे नुकसान झाले आहे. ईव्हीएम मशीनची होळी करण्याचा प्रयत्न केल्याने बागलवाडी येथील मतदान केंद्रावर काही वेळेसाठी मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती. यानंतर नवीन ईव्हीएम मशीनची जोडणी करून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यामुळे बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र घडलेल्या घटनेबाबत सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

काळ्या टोपीचा काळा विचार ४ जूनला हातपाय खोडत बाहेर येणार! नवनाथ दत्तात्रय रेपे

‘नको आम्हाला कलम ३७०, रिंगणात पाहिजेत उमेदवार १०७०’ नवनाथ दत्तात्रय रेपे
एक मराठा लाख मराठा घोषणा देत ईव्हीएम पेटविण्याचा प्रयत्न
ईव्हीएम पेटविण्याचा प्रयत्न करणा-या मुलाने यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मतदान करण्यासाठी वापरण्यात येणा-या ईव्हीएम मशीन बोगस असल्याचा आरोप या तरूणाकडून केला जात होता. दिल्याची माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.