ईव्हीएम हटाव, दांडपट्ट्याने ईव्हीएम मशिनची प्रतिकृती फोडत भारतीय बेरोजगार मोर्चाकडून सरकारचा निषेध

0 486

ईव्हीएम हटाव, दांडपट्ट्याने ईव्हीएम मशिनची प्रतिकृती फोडत भारतीय बेरोजगार मोर्चाकडून सरकारचा निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय बेरोजगार मोर्चाच्यावतीने आयोजित बेरोजगार जोडो यात्रा अंतर्गत शनिवारी दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. यामध्ये ईव्हीएम हटाव, देश बचाव या मागणीसह देशात वाढणाऱ्या बेरोजगारी विरोधात सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी सिद्धांत मौर्य, संयोजक राकेश गायकवाड, संघटक राकेश गायकवाड यांनी नेतृत्व केले. यामध्ये देशात वाढणारी बेराजगारी, त्याची कारणे, आत्महत्या, खासगीकरण, कामगार कपात सरकारचे ढिसाळ नियोजन याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मोर्चामध्ये संतोष नागवंशी यांनी मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक दाखवत, दांडपट्ट्याने ईव्हीएम मशिनची प्रतिकृती फोडून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी किरण कांबळे, बाबासो कांबळे, अॅड. सुनिल नागदिवे, रणजित देवलकर, बाजीराव नाईक, अनिता बावडेकर, सुरेखा कांबळे, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.