अतिक्रमणाविरोधात तपसे पती पत्नीचा आत्मदहनाचा ईशारा

0 235

अतिक्रमणाविरोधात तपसे पती पत्नीचा आत्मदहनाचा ईशारा

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास चंदनसावरगाव ग्रामपंचायत प्रशासनाची चालढकल

 

केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार चालविला असून आपल्या राहत्या घराच्या शेजारीच ऐन रहदारीच्या रस्त्यावरच गावातील चंद्रकांत शिवाजी पांचाळ यांनी अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण गेल्या दोन वर्षांपासूनसाठी अनेक वेळा तक्रारीं व अर्ज देऊनही रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास चंदनसावरगाव ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे अस विष्णू मारोतीराव तपसे यांनी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात लेखी स्वरूपात आणून दिले होते.

ग्रामपंचायत प्रशासनाने हे अतिक्रमण तात्काळ न हटविल्यास पती विष्णू मारूतीराव तपसे व त्यांच्या पत्नी सौ. सीताबाई विष्णू तपसे यांनी २१ मे रोजी रस्ता रोको आंदोलन करून त्याच ठिकाणी दोघे नवरा बायको आत्मदहनाच करणार असल्याचा इशारा यांनी केजचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन सदर प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवून या प्रकारणाची सुनावणी आपल्या स्तरावर घेण्यात यावी यासाठी सदरचे प्रकरण वर्ग केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चंदनसावरगाव येथील रहिवासी विष्णू मारोतीराव तपसे व सौ. सीताबाई विष्णू तपसे यांच्या राहत्या घरा शेजारीच चंद्रकांत शिवाजी पांचाळ यांचे आहे. दरम्यान चंद्रकांत शिवाजी पांचाळ यांनी ऐन रहदारीच्या रस्त्यावरच अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून चंदनसावरगाव ग्रामपंचायती कडून टाळाटाळ केली जात आहे. परिणामी याबाबत विष्णू मारोतीराव तपसे व सौ. सीताबाई विष्णू तपसे यांनी अनेक वेळा अर्ज देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यासाठी विष्णू मारोतीराव तपसे व सौ. सीताबाई विष्णू तपसे यांनी १४ मार्च २०२३ रोजी ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण देखील केले होते. मात्र ग्रामपंचायतीचे संरपंच व ग्रामसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पदाचा दुरूपयोग करून खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून तक्रारदार यांची मानहाणी करून मानसिक त्रास दिला. त्यामुळे येत्या २० मे २०२३ पर्यंत सदराचे अतिक्रमण हाटविले नाही तर आपण ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभार विरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विष्णू मारोतीराव तपसे यांनी दिला आहे. तर त्यांच्या पत्नी सौ. सीताबाई विष्णू तपसे यांनी पतीच्या चितेवर सतीजाण्याचा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.