काळे बोरगाव येथे होणा-या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे दिपक इंगळे यांचे आवाहन

0 231

काळे बोरगाव येथे होणा-या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे दिपक इंगळे यांचे आवाहन

 

मुरुड : जगाचा पोशिंदा वाचाला पाहीजे, त्यांच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळाला पाहीजे. त्यांची होणारी आर्थिक लुट थांबली पाहीजे, त्याला दिवसा वीज देऊन त्याला शेतकरी म्हणून मान सन्मान मिळावा पाहीजे या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष दिपक इंगळे हे नेहमी प्रशासनाकडे निवेदने व आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतात. आज राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे चिंतन करण्याची काळे बोरगाव येथे कार्यक्रम व नुतन शाखाचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमाला सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

लातूर जिल्ह्यातील काळे बोरगाव येथे आज दि. १५ रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय किसान मोर्चा च्या नवीन शाखेचे उद्घाटाटनाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात राष्ट्रीय किसान मोर्चाची आवश्यकता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच इतर काही विषयांवर चर्चासत्रे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय किसान मोर्चा बोरगाव काळे शाखा उद्घाटन सोहळ्यानिमित्त शेतकरी प्रबोधन सभेत पुढील विषयावर चर्चा आयोजित केली जाणार आहे. १) हमीभावाचा कायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांना पिकांचा योग्य भाव मिळणार नाही. २) पिकविम्याला पर्याय म्हणून IRMA (इर्मा) Income Risk Management in Agriculture कायद्या विषयी जनजागृती. ३) शेती वीजबिल घोटाळाविषयी जनजागृती, शेतकऱ्यांची होणारी लूट. ४) शेतीला वीज व पाणी या पायाभूत सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची शासनाची एक संविधानिक जबाबदारी- एक चर्चा ५). शेतकऱ्यांच राष्ट्रव्यापी संघटन बनल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्यांच समाधान शक्य नाही- एक चर्चा.

या कार्यक्रमाला सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने दिपक इंगळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.