संतप्त शिवप्रेमींनी ग्रामपंचायतच्या बंद दारा पुढे जयंती केली साजरी !

0 159

संतप्त शिवप्रेमींनी ग्रामपंचायतच्या बंद दारा पुढे जयंती केली साजरी !

सिरसाळ्यातील प्रकार, ग्रामपंचायत कारभा-यांना शिवप्रेमी विचारणार जाब

सिरसाळा : राज्य/देश भरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. सिरसाळ्यातही शिवप्रेमी युवकांनी पोहनेर रोड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात जयंती साजरी केली. परंतु सिरसाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत कारभा-यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी न केल्याने संतप्त शिवप्रेमी युवकांनी ग्रामपंचायत च्या बंद दारा समोर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य प्रतिमा माडंत जयंती साजरी केली. यावेळी ग्रामपंचायत चा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करणा-यात आली. या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य लखन गायकवाड सह सोनू ढाकणे,ओमकार टाले, सूरेश किरवले, अतूल कुंभार, अनिकेत पाटिल, संतोष विके, विकास गायकवाड, राहूल गायकवाड, अजय काळे, कैलास कावरे, रुशिकेश कराड, अविनाश मेंडके, राजेभाऊ पाटील आदीसह अनेकजण उपस्थित होते.

संतप्त शिवप्रेमी जाब विचारणार : सिरसाळा ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ ह्या महापुरुषांची जयंती का साजरी केली जात नाही या बाबत आज सिरसाळा ग्रामपंचायत येथे संतप्त शिवप्रेमी युवक ग्रामपंचायत कारभा-यांना जाब विचारणार आहेत असे माजी ग्रामपंचायत सदस्य लखन गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.