फेरमतदान घेण्यात यावे काँग्रेस उमेदवार काका पाटील यांची मागणी

0 345

फेरमतदान घेण्यात यावे काँग्रेस उमेदवार काका पाटील यांची मागणी

 

निपाणी : इव्हीएममध्ये बिघाड किंवा मतांची हेराफेरी होत नाही म्हणणारांसाठी धक्का देऊन विचार करायला लावणारी गोष्ट कर्नाटक विधानसभेच्या मतदान मोजणीतून उघडकीस आली. प्रचार यंत्रना थंडावल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी दि. १० हे रोजी मंगळवारी सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली. निपाणी मतदारसंघात चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. मात्र अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक १५३ मध्ये ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असून या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस उमेदवार माजी आमदार काका पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भातील पत्रक उमेदवार काका पाटील आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या देण्यात आलेल्या तक्रारीत अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक १५३ मध्ये प्रत्यक्षात ६६७ मतदारांनी मतदान केले आहे. मात्र ईव्हीएम मशीनमध्ये ७१८ जणांनी मतदान केल्याचे दाखवत आहे. त्यामुळे वाढीव ५१ मध्ये कुठून आली किंवा कोणी मतदान केले याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर फेरमतदान घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली आहे. अशी माहिती कामा पाटील व लक्ष्मण चिंगळे यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.