सत्य आणि वास्तव वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासमोर मारहाण

0 979

सत्य आणि वास्तव वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासमोर मारहाण

मुंबई : मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो मात्र काही प्रसारमाध्यमे राजकीय हस्तकाचे दलाल बनले आहेत त्यात प्रामाणिकपणे सत्य लिहणा-या आणि वास्तव दाखवणा-यांना या राजकीय हस्तकाचे गुलाम मारझोड करतात ते पण खुद राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे समोर तेव्हा हे तोंड दाबून गप्प बसताना दिसतात. त्याच असं की, चुनाभट्टी येथिल सोमय्या मैदानावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाचा फ्लॉप शो झाला. त्यावेळी काही पत्रकारांनी त्या कार्यक्रमात असलेल्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढल्याने सदरील कार्यक्रमात राजकीय पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या पत्रकाराला बेदम मारहाण केली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. परंतू विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले गृहमंत्री व्यासपीठावर असताना शिंदेंच्या शिवसेना गटातील गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा सत्यानाश झाला असे मानायला काहीच हारकत नाही.

मुंबई मधील चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात महानगर पालिकेच्या महिला-बाल कल्याण विभागाचा कार्यक्रम शनिवार दि. १४ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंतत्री यांच्या हस्ते शहरातील २७ हजार गरजू महिलांना यंत्रसामुग्री वाटप केले जाणार होते. या कार्यक्रमात कोणतीही यंत्रासामुग्री मिळणार नाही, फक्त कूपन दिले जाणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिलांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने रिकाम्या खुर्च्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच आलेल्या महिला कार्यक्रमातून निघून जाऊ लागल्या. त्यामुळे मैदानातील निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या दिसत असल्याने त्याचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना शिंदेंच्या शिवसेना गटातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली.

या घटनेचे सविस्तर वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रकाशित केले आहे. त्यानुसार, रिकाम्या खुर्च्यांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली गेली आहे. चुनाभट्टीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील शनिवारी घडलेला हा संतापजनक प्रकार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महिलांना यंत्रसामुग्री वाटप कार्यक्रमातील हा दुर्दैवी प्रकार आहे. निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे फोटो काढत असताना दोन पत्रकारांना शिंदे सेनेच्या काही गुंडांनी जबर मारहाण केली. या पत्रकारांना चुनाभट्टी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गुंडांच्या घोळक्यातून बाहेर काढले. हे गुंड पोलिसांवरही धावून जात होते. पोलिसांना न जुमानता त्यांची गुंडगिरी सुरू होती. जिगरबाज पोलिसांमुळे या पत्रकारांचा जीव बचावला. पोलिसांना न जुमानता गुंडांकडून पत्रकारांना मारहाण होत असताना राज्याचा गृहमंत्री कार्यक्रमस्थळी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पत्रकारांना गुंडांकडून मारहाण होत असताना व्यासपीठावर होते.

त्यातील एका पीडित पत्रकाराने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला. मात्र पोलिस दबावात असल्याने त्यांनी गुन्हा नोंदवून न घेता फक्त तक्रार अर्ज घेतला. संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कोणतेही रेकॉर्ड होऊ नये म्हणून साधी ‘एनसी’ही चुनाभट्टी पोलिसांनी घेतली नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.