अभियोग्याताधारक विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक भरती करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

0 467

अभियोग्याताधारक विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक भरती करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

लातूर : जिल्ह्यातील अभियोग्यताधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी यांच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१७ साली शिक्षक भरती घेण्यात आली ती भरती सुद्धा अपूर्ण आहे , त्यानंतर शासनाने २०२३ साली पुन्हा एकदा TAIT (अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा) अत्यन्त घाई गडबडीत घेण्यात आली पण शिक्षक भरती साठी मात्र शासनाकडून दिरंगाई होत आहे.
अशा परिस्थितीत राज्याचे शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर साहेब यांनी पहिल्या टप्प्यात ३०,००० तर दुसऱ्या टप्प्यात २०,००० शिक्षक भरती करू अशी घोषणा केली.

मात्र वित्त विभागाने ८०% पदभरतीला मंजुरी दिली असताना दोन टप्प्यात शिक्षक भरती का ? असा प्रश्न अभियोग्यताधारक विद्यार्थी विचारत आहेत. सदर निवेदनात एकाच टप्यात ५५,००० शिक्षक भरती NCTE च्या नियमानुसार करा तसेच सर्व प्रवर्गासाठी प्रचलित अरक्षणनुसार जागा उपलब्ध करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी या प्रमुख मागणीसह निवेदन देण्यात आले. यावेळी निखिल कांबळे,दत्ता नागरे, शांतेश्वर माने सुमित सातपुते,श्वेता माने, पंकजा तिडके, शुभांगी मस्के,प्रशांत काटे, पांडुरंग शिंदे,रंजना गिरी,साजिद पठाण, श्रीमंत मुंडे, वैभव गायकवाड, योगेश भालके, परवेज शेख पूजा कोडगे, बाळू कावळे, तुकाराम बुरले, मोमीन फरविन आदी उमेदवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.