काळ्या टोपीचा काळा विचार ४ जूनला हातपाय खोडत बाहेर येणार!

0 243

काळ्या टोपीचा काळा विचार ४ जूनला हातपाय खोडत बाहेर येणार!

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे

 

‘इव्हीएम हीच आधुनिक मनुस्मृती आहे, हीचे दहन करून माणसांना मुक्त करा
डाॅ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि आमच्या नेत्यांनी इव्हीएम पाळली’

घरात एखादे कार्य असल्यास जसे घरातील ज्येष्ठांची घाई असते तशीच लोकसभेची आचारसहिंता लागल्यानंतर सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची आणि त्यांच्या मागे फिरून आपली उपजिविकेचा प्रश्न मार्गी लावणा-या झेंडे आणि दांडे बहाद्दरांची धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. नेत्याला तिकीटाची आणि कार्यकर्त्यांना गटार मिळण्याची अपेक्षा असते. नेता जिथे तिथेच भक्त दिसतात, जशा कुत्र्यामागे माशा घोंगतात. निवडणुकीची घोषणा सुरू होण्यापूर्वीच भाजपने ‘अब की बार ४०० पार’ ची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी कशाच्या भरोशावर केली हे महामाहीम परशुरामच जाणो. लोकांना या घोषणेच्या मागचे रहस्य अजूनपर्यंत समजत नसले तरी, हे सर्व राजकीय नेते इव्हीएमच्या जिवावर ४०० पार ची स्वप्न बघत आहेत हे लपून राहत नाही. काळा पैसा, अच्छे दिन, स्मार्ट सिटी आणि दोन कोटी तरुणांना नौकरी देण्याचे आश्वासन देऊन ईव्हीएमच्या माध्यमातून सत्तेवर आलेले भाजपच्या चौकीदाराचे हे सरकार म्हणजे विघ्न संतोषी टवाळखोरांची टोळीच आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. यांनी स्मार्ट सिटी दाखविण्याऐवजी त्या बदल्यात किर्रीटच्या काळ्योभर उघड्याबंब मांड्या आणि प्रदीप जोशीने घेतलेले कवळ्या पोरांचे मुक्के दाखवले. या टवाळखोरांच्या टोळीने संसदेला विळखा घातल्यापासून मराठा, मुस्लिम, धनगर, आदिवासी व आळंदीत सरकारने फटके दिले म्हणून खुद्द वारकरी, सुशिक्षित बेरोजगार, एस. टी. कर्मचारी, जुन्या पेन्शनची मागणी करणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे देखील सरकारच्या विरोधातच आहेत तर मग प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यात ४५ जागा जिंकणार असे म्हणतातच कसे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘अब की बार ४०० पार’ आणि महायुती ४५ पार जागा जिंकणार असे चंद्रशेखर बावनकुळे हे कशाच्या भरोश्यावर म्हणतात? याचा विचार आम्ही करणार आहेत की नाही? मेंदू विरहीत भक्तांना असे प्रश्न न पडणे हे साहजिकच आहे पण स्वतःला हुशार समजणारे तुम्ही तरी एवढे बेआक्कली कसे? तोडा फोडा हे राजकारण करीत ‘अब की बार ४०० पार’ म्हणणा-या भाजपने आपला इतर कोणत्या ३ जागांवर पराभव होऊ शकतो हेही सांगून एकदा मोकळे व्हावे म्हणजे विरोधकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे नाही हे समजून जाईल. राज्यातील सर्वात मोठी जात मराठा आणि दुस-या नंबरची सर्वात मोठी जात धनगर व त्यापाठोपाठ मुस्लिम हे सर्व समाज जर सरकारच्या विरोधात रस्त्यावर संघर्ष करून या मनुवादी सरकारचे वाभाडे काढत असतील तर मग भाजपच्या ४५ जागा विजयी होतीलच कशा? ४५ जागांवर भाजपचा विजय होणार तर मग त्यांच्या कोणत्या ३ जागा पडणार आहेत? हे पन्नासआणिदोन कुळे का सांगत नसतील? राज्यातील मराठा, मुस्लिम, धनगर आणि सुक्षिशित बेरोजगार हे सर्वजण भाजप विरोधात असतील तर मग हे प्रदेशाध्यक्ष ४५ जागांचे स्वप्न कोणाच्या मतांवर बघत आहेत? पंधरा लाखाचे आमिष दाखवून त्याबद्दल किर्रीटच्या काळ्याभोर मांड्या दाखविणारे येवढ्या जागांवर निवडून येतील का? म्हणजे तोंडावर मिश्या असलेल्या आणि बायकांप्रमाणे वर्तन करणा-यांनी इव्हीएमला पालथे घालून तिच्यावर बलात्कार केला आहे हे निश्चित. या बलात्कारामुळे इव्हीएमच्या उदरात जो रेशीमकीड्यांच्या वीर्याचा भडीमार केला गेला त्याचाच तर गर्भ इव्हीएमच्या बेंबीआत वाढत असावा. त्यामुळेच तर हे रेशिमकीडे तर्कहीन आणि पांचट बोलताना ४५ जागा जिंकणार हे खात्रीने सांगत आहेत. इव्हीएमच्या बेबींआत दडलेला ब्राम्हणी विचारांचा आणि काळ्या टोपीचा संघी ४ जूनला हातपाय खोडत बाहेर येणार असल्याने तर पोलिसांचे कान फुंकणारी आत्या उभ्या महाराष्ट्रात कोकलत आहे. त्यामुळे म्हणावेसे वाटते की,
‘काळ्या टोपीचा काळा विचार हद्दपार करा
त्यासाठी आधी इव्हीएमचा बाजार रद्द करा
आमच्या मतावर हे भडवे काळा विचार पोसणार
आम्ही राजकारणातील संघी विचार कधी जाळणार?’

मराठा आरक्षणाची मागणी करणा-या मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाने गावागावातून जास्तीचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २४ मार्च रोजी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी या निर्णयामुळे मराठा समाजाच्या मताचे विभाजन होईल या भितीने त्यांनी तो निर्णय तिथेच थांबवला. या बैठकीत त्यांनी आपल्या समाजाने निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे का? आणि जिल्ह्यातून एक उमेदवार द्यायचा का? असे दोनच प्रश्न गावातील ज्येष्ठांना विचारून त्यांचा लेखी रिपोर्ट आंतरवाली सराटी येथे २९ मार्च पर्यंत पाठविण्याचे आवाहन केले. या निर्णयामुळे अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या मागे गटारीच्या अपेक्षेने फिरणा-या मागे फिरणा-या विना शेपटीच्या कार्यकुत्र्यांच्या काळजाचे पाणी झाले. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांचा फायदा तर अनेकांचा आपला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे काहीजण मनोज जरांगे यांच्या या भूमिकेचे समर्थन तर काहीजण विरोध करताना दिसत आहेत. विरोध करणारे तेच आहेत ज्यांचे नेते मागिल ७० वर्षापासून देशाच्या राजकारणात सक्रीय असताना त्यांनी केवळ मराठा समाजाच्या हाती तुरी देऊन नामानिराळे राहिले आहेत. ज्या फडणवीसांचा डीएनए विदेशी आहे तो जर ओबीसींचा डीएनए आमचा आहे म्हणत असेल तर मग तुमचे नेते आमचा डीएनए मराठा आंदोलन आणि त्यातील आंदोलकांशी जुळतो हे हक्काने का सांगत नसतील? मराठा आंदोलनाला विरोध करणारांना कोणी पोसले? जे कालपर्यंत बौद्ध बांधवांचा द्वेष करीत होते त्यांना सहारा देऊन मराठ्यांच्या बोकांडी कोणी बसवले हे मराठा समाजाने सगळे ओळखले आहे. या सर्व इव्हीएम मशीनच्या गर्भाशयातून निघालेल्या पैदाईशी आहेत. इव्हीएम हीच आधुनिक मनुस्मृती आहे, जी तुम्हा आम्हाला हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्यासाठी दलाल आणि भडव्यांची निर्मिती करीत आहे, असे म्हटले तर आमचे चुकते तरी कुठे? सर्वपक्षीय राजकीय नेते इव्हीएम संदर्भात केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात करतात. कारण इव्हीएमची क्षमता ३८४ आहे हे माहीत असताना मविआ ती पार करण्यासाठी प्रयत्न करीत नसेल तर भाषणातून इव्हीएमचा केवळ वांझोटा विरोध केला हेच सिध्द होते.

मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाने निवडणुकीच्या रिंगणात जास्तीचे उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने संघ, भाजप आणि खुद्द निवडणुक आयोगाच्या पायाखालची वाळू सरकली होती. यामध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ‘निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मार्गदर्शन करण्याची मागणी केली. जास्त उमेदवारांनी अर्ज भरल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना कळवाव्यात, अशी मागणी या पत्रात करण्यात आली.’ (सराकारनामा ७ मार्च २०२४) मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे जर प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकत असेल तर हा समाजाच्या निर्णयाचा विजय म्हणावा लागेल. यानंतर राज्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांना लोकसभा निवडणुकीत ५००० उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याचे बोलले जात आहे. जर लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले, तर निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या लागतील. ४०० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज आल्यास केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेतील. मात्र ४०० पेक्षा कमी अर्ज आले, तर मतदान ईव्हीएम मशीनवर होईल. मात्र, ४०० हून अधिक अर्ज आल्यास बॅलेट पेपरवर मतदान होईल. यापूर्वीही निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेतलेल्या आहेत. बुकलेट मतपत्रिकेच्या माध्यमातून ४०० पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावांचा, चिन्हाच्या आधारावर मतदारांकडून शिक्का मारुन मतदान केले जाऊ शकते, याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. (ई टीव्ही भारत १६ मार्च २०२४) ४०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्यास जर इव्हीएम हटवून बॅलेट येणार असे जर निवडणूक आयुक्तच सांगत असतील तर मग इंडिया आघाडीचे नेते डम्मी उमेदवार देऊन ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यास निवडणूक आयोगाला भाग पाडतील का? मनोज जरांगे यांच्या आंदोलकांनी निवडणूकीचा निर्णय घेतल्यास इंडीया आघाडीचे नुकसान होतेय असे म्हणून आभाळ हेपलणा-यांनो तुम्ही ज्यांनी पादत्राणे उचलून जय म्हणत आहात त्यांना विचारा इव्हीएम नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्ही किती डम्मी उमेदवार देणार आहात? कारण भाजप खासदार डी. अरविंद म्हणतो की, कोणालाही मत द्या, पण ते मत भाजपलाच मिळेल. (सकाळ २५ आॅगस्ट २०२३) मग पत्रकार परिषदा आणि भाषणातून इव्हीएम विरोधात दोन बाणा मारल्याने इव्हीएम हद्दपार होणार आहे का? मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयावर जर निवडणूक आयोग प्रतिक्रीया देत इव्हीएम मशीन आणि त्याची क्षमता सांगून जास्तीचे उमेदवारी अर्ज आल्यास निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेतली जाईल असे सांगत असेल तर मराठा समाजाच्या या निर्णयाचे इंडिया आघाडी आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी सर्वात आधी स्वागत करायला पाहिजे होते. इंडिया आघाडीचे नेते राहूल गांधी यांनी इव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करून आपण इव्हीएमचे विरोधक आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला परंतू भाषणातून इव्हीएम मशीन खरच हद्दपार होईल का? ३८४ उमेदवारांपेक्षा जास्तीचे उमेदवार उभे राहील्यास या लोकसभा निवडणुकीतील निवडणुक प्रक्रिया बॅलेट पेपरवर होणार असेल तर मग काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे ३८५ डम्मी उमेदवार देऊन या निवडणुकीतून इव्हीएम हद्दपार करण्यासाठी कोणते प्रयत्न करताना दिसतात का? इव्हीएम नकोच आहे तर मग ती हटविण्यासाठी या पक्षाकडे असा कोणता प्लॅन आहे ज्याद्वारे ते इव्हीएम हटवून ही निवडणूक बॅलेटद्वारे घेण्यास निवडणूक आयोगाला भाग पाडणार आहेत?
बहुजन समाजासह मराठा समाजाने जास्तीत जास्त उमेदवार देऊन या निवडणुकीत इव्हीएमचा गर्भपात करून तिच्या पोटात वाढणारा विषमतेचा विषाणू जागीच नष्ट केला तरच हा ब्रह्मराक्षस आणि ब्राह्मण कावा ठेचला जाईल. इंडिया आघाडीला जर सत्तेची सूत्रे पाहिजेच असतील तर मग ते ३८४ डम्मी उमेदवार देणार आहेत का? रेशीमकीड्यांच्या वीर्याचा फवारा इव्हीएमचा आत गेल्यामुळे ती सध्या पोटशी असल्याने तर तिच्या व्हिवळण्यातून ‘अब की बार ४०० पार’ चा नारा येत आहे. हा नारा ऐकून इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा पारा चढताना कुठेच का दिसत नसेल? इव्हीएमला भाषणातून विरोध केल्यामुळे जर ती बंद झाली असती तर निवडणुक आयोगाने तशी घोषणा केली नसती का? भाषणे देऊन वेळ आणि उर्जा वायफळ घालण्यापेक्षा इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी त्यांच्या मागे गटारीसाठी फिरणा-या कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज भरून इव्हीएमच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार देऊन या निवडणूक प्रक्रियेतून आधुनिक मनुस्मृती म्हणजेच इव्हीएम हद्दपार करण्यासाठी पावले उचलली तरच ‘अब की बार ४०० पार’ चा विषाणू इव्हीएमच्या गर्भात चारीमुंड्या चित होईल. एकदा का इव्हीएमचा गळा घोटला की बॅलेटचा पुर्नजन्म होण्यास वेळ लागणार नाही. आता काही भक्त चिडतील आणि असा विरोध केल्याने युतीला फायदा होईल, असे म्हणत आरोळी ठोकून मोकळे होतील त्या मनोरुग्णांना विचारावेसे वाटते की, तुमच्या राजकीय नेत्यांवर बोललं की पृष्ठभागाचे चरकांडे निघाल्यागत बोंबलणारांनो,
इव्हीएम हटविण्यासाठी तुमच्या नेत्यांकडे कोणता प्लॅन आहे?

मुंबईतून राहुल गांधी यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आणि त्यानंतर ते शांत बसले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे पाण्यात सोडलेला पाद होता ज्याचे बुडबुडे केवळ मुंबईतील सभे पुरतेच निघाले, असे म्हटले तरी चालेल. कारण ही इव्हीएम नकोच आहे तर मग ती हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडी कोणते प्रयत्न करीत आहे हे एकदा त्यांनी जनतेपुढे खुले पणाने जाहीर का केले नसेल? बर जाहीर केले नसेल तर मग ती इव्हीएम हटविण्यासाठी प्लॅन बी इंडिया आघाडीकडे आहे का? मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाने १००० उमेदवार देण्याचा केवळ निर्धार केल्यानंतर जर बीड लोकसभेच्या उमेदवार पंकज मुंडे यांना ही निवडून खिन्न करीत असेल तर मराठा समाजाने मारलेला तीर योग्यच होता, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही. निवडणुकीच्या रिंगणात जास्तीचे उमेदवार आले तर ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, असे निवडणूक आयोग सांगत असेल तर मग हे इंडिया आघाडीच्या दृष्टीने चांगले नाही का? इव्हीएम हटविणे हाच जर इंडिया आघाडीचा उद्देश असेल तर मग त्यांनी कालपर्यंत पुढे येऊन मराठा समाजातील आंदोलकांच्या निर्णयाचे स्वागत का केले नसेल? बर ते पांढरे शुभ्र कपडे घालून फिरणारे लोक फाटक्या कपड्यातील आंदोलकांच्या स्वागतासाठी शरमले असतील? या पोट फुगलेल्या नेतेमंडळींनी प्रत्येक मतदारसंघात ३८५ डम्मी उमेदवार देऊन ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यास भाग पाडून इव्हीएमच्या गर्भात वाढणा-या विषमतेच्या विषाणूंचा इव्हीएमच्या गर्भातच शिरच्छेद करण्यासाठी पुढे का येत नसतील? मनोज जरांगे यांच्या मागे असलेल्या सर्व सामान्यांच्या घरातील पोरांनी जी आयडीया शोधुन काढली ती आयडीया आजपर्यंत इंडिया आघाडीतील नेत्यांनी लोकांपुढे का मांडली नसेल? मनोज जरांगे यांच्या माध्यमातून हक्क अधिकारांसाठी रस्त्यावरचा संघर्ष करणारी पोर जर डम्मी उमेदवार देऊन इव्हीएम हद्दपार करण्यासाठी धडपड करीत होती तर मग अशी धडपड इंडिया आघाडीतील एकही पक्ष आणि नेता का करताना दिसला नाही किंवा दिसत नाही. या नेत्यांचे लक्षण म्हणजे दुस-यांच्या जिवावर आणि गांड ठेवली पेवावर असेच नाहीतर कसे आहे? डम्मी उमेदवार देण्याचे खरे राजकारणातून बक्कळ पैसा कमावलेल्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी करायला पाहिजे. पण ते जेव्हा याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष करताना दिसतात तेव्हा यांचा उद्देश नेमका काय? हा प्रश्न पडतो. हे लोक इव्हीएम हटविण्यासाठी भाषणांशिवाय दुसरे प्रयत्न करतात तरी कोणते? भाषणामुळे जर सगळेच मिळाले असते तर बहुजन समाजाची एवढी वाताहात झाली असती का? अनेक नेत्यांचे पक्ष फोडून त्याचे वस्त्रहरण केले तरी हे लोक इव्हीएम हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नसतील तर इव्हीएमच्या कांडात यांचाही हात असावा अशी चर्चा सुरू होण्यापूर्वी या राजकीय नेत्यांनी डम्मी उमेदवारांचा प्लॅन आखला पाहिजे नाहीतर ४ जून नंतर पाद निघुन गेल्यास गांड दाबून धरण्यात कोणतेही शहाणपण नाही. एका मुलाखतीत तुम्हाला एवढी कमी मतदान का पडते या प्रश्नाला अभिजित बिचकुले यांनी उत्तर देताना म्हटले की, ‘ईव्हीएम मध्ये काहीतरी झोल आहे.’ मग प्रश्न पडतो की, ज्याला मनोरुग्ण म्हणतात त्या बिचकुलेंना जर इव्हीएमचा घोळ कळत असेल तर मग मराठा द्वेषाने झपाटलेल्या छगन आणि वडेट्टीवार यांना का समजत नसेल? यांचा मेंदू आणि तोंड फक्त मराठा समाजाला विरोध करण्यासाठीच मोकळे सोडले आहे का? अशा लोकांना जर आम्ही सत्यशोधक म्हणत असू तर आमची आम्हाला लाज वाटली पाहिजे. पण राजकीय नेत्यांच्या पृष्ठभागाचे चामडे खाऊन पोट भरणारांना लाज नव्हे तर माज येतो म्हणून तर ते वाक म्हटले तिथे वाकून नेत्यांच्या भुमिकेला मुजरे करताना दिसतात.

त्यामुळे शेवटी तरूणांना सांगावेसे वाटते की, आजपर्यंत तुम्ही आम्ही दगडापेक्षा इटकर मऊ म्हणून ज्या लोकांना मत देत आलो ते लोक इव्हीएमचा गर्भपात करताना दिसतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवा. आपण ज्या दगडांचा विरोध करतो त्या दगडांच्या विरोधात तात्पुरती भाषणबाजी करून बंड केल्याचे दाखवून अंधारात एकमेकांचा हात हातात धरून एकमेकांच्या मिठीत थंड पडणारे सर्वपक्षीय राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. हे राजकीय दगड आणि तुम्हाला मऊ वाटणारे इटकरींचे तुकडे त्या मनुवादी विषमतावादी भिंतीमधील सापटीत अलगद त्या काळ्या दगडाजवळ जाऊन बसतात तेव्हा इटकर आणि दगड एकच दिसतात. त्यामुळे या दगड आणि इटकरींना आपले न म्हणणे कधीही चांगले आहे. कारण ‘आजचे सर्वपक्षीय राजकीय नेते म्हणजे सार्वजनिक शौच्छालयाच्या खिडकीत ठेवलेल्या वीटकरींचे तुकडे असून ते फक्त रेशिमबागेतील मोहनचा शेंडा साफ करण्याचे काम करतात, असे म्हटले तर कोणता भडवा कोणत्या तोंडाने तो चूकीचे ठरविणार आहे.’

‘इव्हीएम हीच आधुनिक मनुस्मृती आहे.
कालपर्यंत तिने आमच्या पुर्वजांचे अधिकार नाकारले
आज याच मनुस्मृतीने आम्हाला दिवसा ठोकरले
आता हीचे दहन करा अन्यथा ४ जून काळा दिवस साजरा करा!’

Leave A Reply

Your email address will not be published.