भाजपला मतदान करण्यासाठी डाॅक्टरांनी पेशेंटला सांगावे – भाजप नेते रमेश कराड यांनी डाॅक्टरांना लावले कामाला

0 90

भाजपला मतदान करण्यासाठी डाॅक्टरांनी पेशेंटला सांगावे
– भाजप नेते रमेश कराड यांनी डाॅक्टरांना लावले कामाला

लातूर : आत्मनिर्भर भारत करायचा असेल तर नरेंद्र मोदींशिपर्याय नाही. शंभर पैकी नव्वद लोक मोदींना मानतात. समाजामध्ये डाॅक्टरांना आदर्श म्हणून पाहिले जाते. मी डाॅक्टर नसलो तरी डाॅक्टरांच्या चावी मला माहित आहे. या डाॅक्टरांकडे पेशेंट देव म्हणून येत असतात त्यामुळे भाजपला मतदान करण्यासाठी डाॅक्टरांनी पेशेंटला सांगावे, असे आवाहन भाजप नेते रमेश कराड यांनी केले. यामुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजप नेत्यांनी डाॅक्टरांना कामाला लावल्याचे दिसत आहे.

शहरातील प्रयाग निवास येथे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सुसंवाद बैकठीत बोलत असताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी नसते तर देशाचे वाटोळे झाले असते, मोदी नसते तर हिंदुराष्ट्रात राम झाले नसते आणि मुस्लिम राष्ट्रात हिंदू मंदिरे झाली नसती. आज एकही खासदार कमिशन घेतल्या शिवाय काम करीत नाही, फक्त सुधाकर शृंगारे हेच कमिशन न घेता काम करतात. याशिवाय त्यांनी म्हटले की, अजित पवारारांना आम्ही भाजप मध्ये प्रवेश करा असे म्हटले नव्हते. ते मागे लागून भाजपात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, डाॅ. जमादार, डाॅ. शिरोळेकर यांची उपस्थिती होती.
यानंतर पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघ कार्यालयात कार्यरत होते. ते अपघाताने राजकारणात आले. त्यांचे संघटन कौशल्य पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना राजकारणात येण्याचा आग्रह केला. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा संघाचे गुजरातमधील काम माझ्याकडे आले. त्याठिकाणी त्यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आले. त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही, त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच केला नाही. त्यांनी आपल्यासोबत निस्वार्थी टीम तयार केली. ते चारित्र्यसंपन्न असल्यामुळे त्यांना निवडून घेतले. त्यांचे कुटुंब आजही सामान्य जिवन जगत आहे. मोदींना आवाहन केल्यानंतर युक्रेन आणि रशिया यांनी आपल्यातील युध्द थांबवले. जे अयशस्वी लोक आहेत तेच इंडिया आघाडीत आहेत, ही निवडणूक म्हणजे वास्तविकतेकडे जाण्याचा टप्पा आहे. अजून मोदींना पाच वर्ष मिळाली तर भारत जगात सर्वात पुढे जाईल, असे सांगून त्यांनी मी राजकारणी नसलो तरी मला राजकीय अभ्यास आहे, असे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.