नारळाचा फटक्याने कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या मेंदूला सुज – कथाकार मिश्रा यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

0 1,611

नारळाचा फटक्याने कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या मेंदूला सुज
– कथाकार मिश्रा यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

नीमच : आपल्या कथांमधून भक्तांना अंधश्रेध्देच्या चिखलात ढकलण्याचे काम करणारे मध्य प्रदेशातील कथाकार पंडित प्रदीप मिश्रा हे जखमी झाले. भक्तांने फेकलेल्या नारळाच्या फटका त्यांच्या डोक्यात बसल्याने मिश्रांच्या मेंदूला सूज आली. यामुळे कथाकार मिश्रा यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
प्रदीप मिश्रा यांनी यासंदर्भात एक प्रसिध्द केला आहे. यामध्ये त्यांनी आपण पूर्ण बरे झाल्यानंतर कथा करणार असल्याचे सांगितले आहे. ते नीमच याठिकाणी शिव महापुराण सांगणार होते. मात्र त्यांच्या डोक्यात पडलेल्या नारळाच्या फटक्याने ती कथा रद्द करण्यात आली.
पंडित प्रदीप मिश्रा हे २९ मार्च रोजी महादेवाची होळी खेळण्यासाठी भाविकांमध्ये सिहोर येथील आष्टा येथे पोहोचले होते. यादरम्यान एका भक्तांच्या जमावाकडून नारळ फेकला गेला. याच फेकलेल्या नारळाचा फटका पंडित मिश्रा यांच्या डोक्यात बसल्याने ते जखमी झाले. नारळाच्या जोरात लागलेल्या फटकयामुळे त्यांना चक्कर आली. यानंतर फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांना इंदूरला जावे लागले. त्यांच्यावर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये तीन दिवस उपचार सुरू होते. त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
मानसा येथे सोमवारी आपल्या सर्व भक्तांची भेट घेतल्यानंतर पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले, ‘२९ मार्च रोजी आष्टा येथे आयोजित होळी उत्सवादरम्यान नारळाच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे माझ्या मेंदूला सूज आली आहे. डॉक्टरांनी कथा सांगण्यास नकार दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी येथे पोहोचलो आहे. मी सर्व भक्तांची माफी मागतो. तब्येत बिघडल्यामुळे कथा शक्य होणार नाही. तब्येत सुधारली तर आगामी कथा असेल. अन्यथा तेही रद्द केले जातील.  पुढच्या वर्षी याच तारखेला मानसा येथे भव्य कथेचे आयोजन केले जाणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतो.

Leave A Reply

Your email address will not be published.