लोकसभा निवडणूकीत मुहूर्त आणि राहूचे खुळ – दूरध्वनीच्या माध्यमातून मुहूर्ताची विचारणा

0 20
लोकसभा निवडणूकीत मुहूर्त आणि राहूचे खुळ
– दूरध्वनीच्या माध्यमातून मुहूर्ताची विचारणा
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या लोकसभा निवडणूकीत उमेदवारांच्या डोक्यात असलेले मुहूर्ताचे खुळ पाहायला मिळत आहे. यासाठी ते सुभाष मुळे यांना दूरध्वनीच्या माध्यमातून मुहूर्ताची विचारणा करीत आहेत. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील अर्ज भरण्याचा गुरुवारी हा शेवटचा दिवस आहे. या निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार राहूकाळ, गुरुबळ, राहुचा होरा हे बघण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील उमेदवारही मुहुतार्साठी विचारणा करीत आहेत. या निवडणुकीच्या लगबगीत मुहुर्ताला पाहण्याचे नियोजन केले जात आहे.
पहिल्या टप्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. यामुळे अनेक उमेदवार मुहुर्ताच्या कचाट्यात आडकल्याचे दिसत आहे. ४ एप्रिल रोजी सकाळचा वेळ चांगला असल्याचे सांगितले जात आहे. या काळात फक्त मुहुर्त विचारले जात नाही तर राजकीय यश मिळावे म्हणून वेगवेगळी अनुष्ठाने आणि यज्ञही केले जात आहेत. चंद्र बल आणि गुरू बल चांगले असणाºयांना यश मिळते, असे सांगितले जात आहे. अनेकजण तंत्रोपसना करत असल्याचे समजत आहे. यामध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्यासाठी विचित्र हनुमान अनुष्ठानही केले होते. नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी होमही केले जात आहेत.
राजकीय नेते मंदिराच्या गाभाºयात 
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही नेते कुलदैवताचे दर्शन घ्यायला जाताना दिसत आहेत. नारायण राणे यांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले. नांदेडचे प्रताप चिखलीकर साईबाबाचे भक्त आहेत. कॉग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकुरकर तर परभणी जिल्ह्यातील त्रिधारा या ठिकाणास आवर्जून दर्शनाला येत. शिवसेनचे उमेदवार चंद्रकांत खैरे दर दिवशी खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेत असून ते अगदी दिवसभरातील राहू काळही टीपून ठेवतात.
मुहूर्ताचे खुळ बुवा बाबाची चांदी 
निवडणुकीचा काळ सुरू आहे. या काळात ज्यांच्या मनात हारण्याची भिती दडलेली असते असे सर्व राजकीय नेते मुहूर्ताचे खुळ डोक्यात घेत असल्याने ते बाबाच्या पायाचा धावा घेताना दिसत असल्याचे बाबाची चांदी होत असल्याचे दिसत आहे.  तिसºया आणि चौथ्या टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी कधीचा मुहुर्त चांगला आहे हा मुहुर्त आधीच काढून ठेवला असल्याचे हे बाबा सांगताना दिसत आहेत. यामुळे पराभव होईल या भितीने हे राजकीय नेते मुहूर्त बघण्यासाठी बाबाकडे धावत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.