झरीकरांनी घेतला हार्ट अटॅकचा धसका – उपाययोजना करण्याची वैद्यकीय अधिकाºयांकडे मागणी

0 27

झरीकरांनी घेतला हार्ट अटॅकचा धसका
– उपाययोजना करण्याची वैद्यकीय अधिकाºयांकडे मागणी

परभणी : जिल्ह्यातील झरी व पंचक्रोशीत मागील दोन महिन्यापासून अचानक हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याने गावातील अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गावातील काही जणांच्या ब्लड प्रेशरमध्ये वाढ झाली असुन काहींवर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्याने झरीकरांनी हार्ट अटॅकचा धसका घेतल्याने यावर काही उपाययोजना करण्याची मागणी गावातील नागरिकांनी वैद्यकीय अधिकाºयाकडे केली आहे.
झरीचे माजी सरपंच, गजाननराव देशमुख, क्रिडाधिकारी शैलेंद्र सिंह गौतम, साडेगावचे माजी चेअरमन सदाशिव नाईक यांच्यासह पंचक्रोशितील इतर अनेक जणांच्या आकस्मित जाण्याने झरीतील तरुण वर्ग धास्तावला आहे. इतर कारणांनी छातीत दुखत असले तरी आपणास हार्ट अटॅक येतों की काय असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी जनजागृती करून आपण आपल्या स्तरावरून जे शक्य होईल ते त्वरित हाती घेऊन पंचक्रोशीत या बाबत माहिती मार्गदर्शन होईल तसेच झरीतील सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपण हार्ट अटॅकची काळजी व उपाय योजना या बाबत मार्गदर्शन करण्यात यावे. अशा आशयाचे पत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना झरी ग्रामपांयतीच्या वतीने दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.